मुंबईत महिलांना पाहुन अश्लील हावभाव व अश्लील चाळे करणाऱ्या आरोपीला गावदेवी पोलीसांनी ठोकल्या बेड्या…

0
Spread the love

प्रतिनिधी-महेश वैद्य

गावदेवी मुंबई: गावदेवी पोलीस ठाणे डिटेक्शनची अतिउल्लेखनीय कामगिरी गुन्हा रजिस्टर क्रमांक 311/22 कलम 509 भारतीय दंड विधान कलम अन्वये.

फिर्यादी महिला वय 23 वर्षे रोहित रा.ठि. ps गावदेवी,मुंबई तसेच आरोपी नामे राम लखन कन्हैया लाल वय 32 वर्षे राहणार मुक्काम पोस्ट रघुनाथ नगर ,जिल्हा संत रविदास नगर, उत्तर प्रदेश सध्याचा पत्ता नाना चौक फूटपाथवर पोलीस ठाणे गावदेवी मुंबई.

*महिलांसोबत अश्लील हावभाव करून सार्वजनिक ठिकाणी महिलेंकडे पाहून अश्लील चाळे करणाऱ्या अज्ञात आरोपीस अटक करण्यात पोलीसाना मोठे यश

गुन्ह्याची थोडक्यात हकीकत अशी की यातील फिर्यादी हे दिनांक 17 जुन 2022 रोजी सायंकाळी 18. 30 वाजताच्या सुमारास त्यांचे घराच्या समोरून कॅनडा ब्रिजच्या खालून कुत्रा घेऊन जात असताना कॅनडी ब्रिजच्या खाली, कचराकुंडी जवळ फिर्यादी यांच्याकडे पाहून त्यांचे समोर पॅन्ट काढून स्वतःच्या प्रायव्हेट पार्टला फिर्यादीकडे बघून हात लावला व अश्लील हावभाव केले. फिर्यादी यांनी आजूबाजूच्या लोकांना बोलवल्यामुळे तो तिथून पळून गेला, म्हणून अज्ञात इसमाने फिर्यादी कडे पाहून पो.ठाणे गावदेवी येथे येऊन दिनांक 17 जुन 2022 रोजी तक्रार दिल्यावरून वरील प्रमाणे गुन्हा नोंद केला.

सदरची घटना ही महिला विषयी असून सार्वजनिक ठिकाणी अश्लील हावभाव करून स्त्रियांच्या मनात लज्जा निर्माण करून विकृत कृत्य करण्याची अतिशय गंभीर स्वरूपाची असल्याने गावदेवी पोलीसानी , पोलीस ठाणे स्तरावर विविध पथके नेमून गुन्हा त्वरित उघडकीस आणण्याकरीता आदेशित केले असता गुन्हे प्रकटीकरणचे अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक श्रीनिवास दराडे व त्यांचे पथक तसेच तपासी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक माने यांनी पोलीस ठाणे गावदेवी तसेच पो. ठाणे डी.बी. मार्ग वि.पी. रोड हद्दीतील संपूर्ण सीसीटीव्ही फुटेज चेक करून,फुटेज वरून फोटो काढून सर्व परिसरात शोध घेतला अथक मेहनतीने, अज्ञात आरोपीचा कुठलाही सुगावा नसताना, अतिशय चिकाटीने तांत्रिक तपास करून बऱ्याच महिण्यापासून मिळून न येणाऱ्या आरोपीस अटक केले व क्लिष्ट गुन्हा उघडकीस आणला.

आरोपीस गुन्ह्याचा हेतू विचारला असता तो सदरचे कृत नशेमध्ये असल्यास करण्याच्या सवयीचा आहे असे त्याने सांगितले. सदरची संपूर्ण कारवाई ही मा. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने सहायक पोलीस निरीक्षक श्रीनिवास दराडे,सहायक पोलीस निरीक्षक माने, पोलीस हवालदार कांबळे, पोलीस नाईक अविनाश कदम, तोडकर, पोलीस शिपाई अवधूत राणे यांनी केली.याबाबत गावदेवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.श्री दत्ताराम गिरप याचे विशेष मार्गदर्शन लाभले.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट