मुंबई सुवर्णकार संघातर्फे नामदार नाना शंकर शेठ यांची 220 वी जयंती साजरी…

प्रतिनिधी- महेश वैद्य

मुंबई: मुंबई सुवर्णकार संघाच्या वतीने शुक्रवार दिनांक १० फेब्रुवारी २०२३ रोजी भारतीय रेल्वेचे जनक नामदार जगन्नाथ उर्फ नाना शंकरशेट यांची २२० वी जयंती साजरी करण्यात आली व त्यानिमित्त वैद्यकीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.सकाळी ठीक १० वाजता मुंबई सुवर्णकार संघाचे सरचिटणीस श्री अदिप वेर्णेकर यांनी दीप प्रज्वलन करुन नानांच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पण केली.
यावेळी मुंबई सुवर्णकार संघाचे सह खजिनदार श्री सत्यविजय मोंडकर,कुंभारवाडा विभागाचे सरचिटणीस श्री रवींद्र सागवेकर कार्यकारणी सदस्य श्री सुधीर पोवळे,मुंबई सुवर्णकार संघाचे सभासद संतोष कुळे,प्रदिप रॉय,रुपेश कराडे,सुनिल पोतदार,मिलन जाना,देवेंद्र गुजराथी,हे उपस्थित होते.त्यानंतर वैद्यकीय शिबिरास सुरुवात झाली.वैद्यकीय शिबिरास उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला दिवसभरात १५० सुवर्णकार बांधव व जव्हेरी बाजारातील नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला.


शिबिरास डॉ.श्री.सदाशिव ओऊलकर ,डॉ. राज तरफदार ,निलेश उबाळे, संकेत धुंदे , अथर्व कदम ,मनाली मोरे,विनोद मोहिते,निलेश थोरे,हर्षद खान,यांच्या सहकार्याने उत्कृष्टरित्या वैद्यकीय शिबिर यशस्वी झाले.

या शिबिरास दिवसभरात रत्नपारखी श्री.हेमंत साने,सुवर्णकार प्रभात मासिकाचे संपादक श्री सुनिल देवरुखकर,कुंभारवाडा विभागाचे अध्यक्ष श्री राजेंद्र देवरुखकर, मेट्रो सिटी पत्रकार श्री स्पर्श देसाई, रक्तदाते श्री संजय कुळकर्णी,श्री.प्रकाश पेडणेकर मुंबई बुलियन चे पदाधिकारी श्री.कानुभाई काकड,कळवा येथून सुवर्णकार श्री.रमेश अनवेकर हे सहपत्निक उपस्थित होते. व असंख्य मान्यवरांनी भेट दिली.


शिबिर यशस्वी होण्यासाठी श्री.विठ्ठल ताटोला ,श्री.रवींद्र सागवेकर,श्री. सत्यविजय मोंडकर,श्री.देवेंद्र गुजराथी,श्री.अशोक सोनी, सौ.संजना मोंडकर, कु.सोनल जाधव यांनी दिवसभर उपस्थित राहून कार्यक्रमास सहकार्य केले.
डॉ.राज तरफदार यांनी संपूर्ण वैद्यकीय टीम व मुंबई सुवर्णकार संघाचे उपस्थित कार्यकर्ते यांना स्वखर्चाने जेवणाची व्यवस्था केली.सायंकाळी मुंबई सुवर्णकार संघाकडून युनिकेअर हेल्थ सेंटर यांचे आयुर्वेदिक क्षेत्रातील योगदानाबाबत मुंबई सुवर्णकार संघाचे सरचिटणीस श्री.अदिप वेर्णेकर यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com