मुंबई पोलीस झोन 12 ची लाॅटरी सेंटरवर मोठी कारवाई

0
Spread the love

मुंबई: गोरेगाव पूर्व येथील दिनांक २६ नोव्हेंबर २०२१ रोजी परिमंडळ 12 चे पोलीस उपायुक्त यानी बेकायदेशिर पद्धतीने चालवित असलेल्या ऑन लाईन लॉटरी सेंटरवर धडक कारवाई केली.

गोरेगाव येथील दिनांक २४ नोव्हेंबर २०२१ रोजी श्री. सोमनाथ घार्गे, मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ -१२ यांना वनराई पोलीस ठाणे हददीत विविध ठिकाणी बेकायदेशिररित्या ऑनलाईन लॉटरीची दुकाने चालु असल्याबाबत माहिती प्राप्त झाली. मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ १२ यांनी तात्काळ परिमंडळातील काही अधिकारी व अंमलदार यांची विविध पथके तयार करुन त्यांना मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी कारवाई करण्याच्या सुचना दिल्या होत्या.

सदर पथकाने तात्काळ वनराई पोलीस ठाणेतील खालील ठिकाणी असलेल्या बेकायदेशिर ऑन लाईन लॉटरी आस्थापनेवर स्थानिक पोलीसांच्या मदतीने छापा टाकुन कारवाई केली आहे. १) लक्ष्मी ऑनलाईन लॉटरी सेंटर, सरदार स्विट मार्ट, जय होमिओपॅथीक मेडीकलसमोर, शॉप नं.२०, कामा इस्टेट, गोरेगांव पुर्व, मुंबई.

२) लकी खेल लोटो, रेणुका रिपेरिंग वर्कस व मारुती कुरियर दुकान यांचे मध्ये, धीरु रवैया चाळ, सोनल
अपार्टमेंट समोर, सोनावाला कॉस रोड नं. १, गोरेगांव पुर्व, मुंबई. ३) जयस्वाल ट्रेडर्स ऑनलाईन लॉटरी सेंटर, पत्ता- सद्गुरु हौ.सो., अवसंती इस्टेट, वालभट रोड, गोरेगांव पुर्व,मुंबई.


सदर तिन्ही ठिकाणाहुन एकुण ०६ गि-हाईक, ३ ऑपरेटर, ३ संगणक सेट, प्रिंटरसह, रोख रु. २९,०००/- असे ताब्यात घेण्यात आले आहेत. सदर प्रकरणी वनराई पोलीस ठाणे येथे गु.र.क. ५८६/२०२१, गु.र.क. ५८७/२०२१, व गु.र.क. ५८८/२०२१, कलम ४२०,३४ भादंविस सह ४(१),८,९,४(अ),५ महाराष्ट् जुगार प्रतिबंधक कायदा अन्वये गुन्हा नोंद करुन अधिक तपास करण्यात येत आहे.


सदरची कारवाई मा. श्री. प्रविण पडवळ सो.अपर पोलीस आयुक्त, उत्तर प्रा. विभाग मुंबई, मा. पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ १२ श्री. सोमनाथ घार्गे यांचे मार्गदर्शनाखाली परिमंडळ १२ मधील मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ 12 यांचे भरारी पथकाने केली आहे.
तरी सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते कि, अशा प्रकारे आपल्या जवळपास कोणताही बेकायदेशिर व्यवसाय चालु असल्यास त्याबाबत परिमंडळ –१२ कार्यालयास माहिती दयावी.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

dipakbhogal@surakshapolicetimes.com

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट