मुंबई पोलीस आयुक्त व सह आयुक्त कायदा व सुव्यवस्था यांसकडून परिमंडळ 11 मधील गुन्हे प्रकटीकरण अधिकारी व पथक यांचा विशेष सत्कार…

0
Spread the love

उपसंपादक -रणजित मस्के

मुंबई : पोलिस उप आयुक्त, परिमंडळ 11 मुंबई मधील गुन्हा प्रकटीकरण अधिकारी व पथक यांच्या थरारक व रोमांचक यशस्वी कामगिरीबाबत माननीय पोलीस आयुक्त सो व सह पोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) सो, बृहन्मुंबई यांनी विशेष सत्कार केला आहे.

ऑपरेशन आंबिवली टीम मधील सर्वांनी टीमवर्क व कॉर्डिनेशन सांभाळून कष्टाने आणि चातुर्याने काम करून इतक्या खतरनाक आरोपीला त्याच्या वस्तीतून उचलून बाहेर आणले व एक खूप मोठे यश संपादन केले .

स्वतःच्या जीवाची किंचितही पर्वा न करता दिलेले ध्येय पूर्ण केले व मुंबई पोलिसांचे नाव उज्वल केले म्हणून भविष्यातही अशीच कामगिरी सर्वांनी करावी. वर नमूद सर्व अधिकारी व अंमलदार यांना मा पोलीस आयुक्त श्री विवेक फणसळकर‌ व‌ सह पोलीस आयुक्त कायदा सुव्यवस्था श्री सत्यनारायण चौधरी * यांनी ०७/०२/२०२३ रोजी नमूद पथकातील सर्व अधिकारी पोलिस अंमलदार व महिला अंमलदार यांना *एक लाख रुपये ,प्रशंसापत्र व मानचिन्ह देऊन सत्कार केला.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट