मुंबईत मोबाईल चोरणाऱ्या महिलांना अटक करुन २१ मोबाईल जप्त करण्यात जे जे मार्ग पोलीसांना अखेर यश..

उपसंपादक-रणजित मस्के
मुंबई :-मुंबई, नवी मुंबई व ठाण्यामध्ये बसमध्ये व गर्दीच्या ठिकाणी मोबाईल व पैसे चोरणाऱ्या महिला टोळीतील दोघींना अटक करण्यात आली. ही कारवाई मुंबईच्या जे जे मार्ग पोलिसांनी केली. या कारवाईत २१ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.
डॉ. वेदिका चंद्रकांत मगर यांचा सर जे जे रुग्णायलातून मोबाईल चोरीला गेला. या प्रकरणी पोलिसांनी (गु. र. क्र . 54/2024) भादंवि कलम ३७९ नुसार गुन्हा दाखल केला. गेल्या काही दिवसांपासून जे जे मार्ग परिसरात वारंवार मोबाईल चोरीला जात होते. या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी तात्काळ आरोपींना अटक करण्याच्या सूचना वरिष्ठांनी दिल्या. त्यानुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रशांत नेरकर, एएसआय सोलकर, कॉन्स्टेबल तडवी, ठाकूर, शेवरे, राजपूत, घाडगे. महिला पोलीस अंमलदार पाटील, लाड, फाटक यांनी वेशांतर करून सलग आठ दिवस बस स्थानकात सापळा लावला. तसेच गर्दीने भरलेल्या बसमधूनही प्रवास सुरू केला तर दुसरीकडे तांत्रिक माहितीच्या आधारे हवालदार पाटील आरोपींचा शोध घेऊ लागले.
पोलिसांची शोधमोहीम सुरू असताना पायधुनी परिसरातील मांडवी येथे दोन महिलांच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. तपासी पथकाने त्यांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता त्यांनी आपापली नावे बसरी वेणू राजी (वय 38 वर्षे, रा ठी. अंधेरी रेल्वे स्टेशन पूर्व परिसरातील ओवर ब्रिज खालील फुटपाथवर अंधेरी पूर्व, मुंबई ), भूमी अरविंद राजी (वय 30 वर्षे, धंदा मजुरी रा ठी. अंधेरी रेल्वे स्टेशन पूर्व परिसरातील ओवर ब्रिज खालील फुटपाथवर अंधेरी पूर्व, मुंबई.) अशी सांगून आतापर्यंत केलेल्या चोऱ्याची कबुली दिली. तपासादरम्यान त्यांच्याकडून डॉक्टर वेदिका यांच्या मोबाईलसह वेगवेगळ्या कंपन्यांचे २१ मोबाईल जप्त करण्यात आले.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com