मुंबई झोन ७ चे पोलीस उपायुक्त श्री. विजयकांत सागर यांच्या संकल्पनेतून तंबाखू मुक्त शाळा कॉलेज परिसर मोहिमेचे आयोजन..

सह संपादक रणजित मस्के
मुंबई :

आजचा युवक हा समाजाचा खूप महत्त्वाचा घटक आहे मात्र ही युवा पिढी खूप मोठ्या प्रमाणामध्ये तंबाखूजन्य पदार्थ अमली पदार्थ यांच्या आहार जात असल्याचे दिसून येत आहे. प्रमाण कमी करण्यासाठी युवा पिढीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जनजागृती होण्यासाठी मा. पोलीस उपायुक्त मंडळ 07 विजयकांत सागर यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ 07 मधील आठ पोलीस स्टेशनमध्ये तंबाखू मुक्त शाळा व कॉलेज परिसर ही मोहीम राबवण्यात आली.
पोलीस ठाण्यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली निर्भया अधिकारी यांनी नोडल अधिकारी म्हणून कामकाज पाहिले. सदर मोहिमेमध्ये हद्दीतील शाळा व कॉलेज परिसरातील शंभर मीटर अंतरामधील पान टपऱ्यांवरती बीएमसी च्या मदतीने निष्काषणाच्या तसेच तंबाखूजन्य पदार्थांच्या जातीच्या कारवाया करण्यात आल्या. कांजमा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ पाटील तसेच निर्भया अधिकारी पोलीस उपनिरीक्षक शितल बाबर यांनी एटीसी पथक व मिल्स स्पेशल यांच्या मदतीने पोलीस ठाणे हद्दीतील 14 शाळा व 02 कॉलेजेस यांचे मुख्याध्यापक व प्राचार्य यांना नोटीस देऊन शाळेच्या गेटवर व 100 मीटर अंतरावर तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करण्यास मलाही असले बाबत फलक लावण्याचा सूचना दिल्या.
आणि कडून प्रत्येक शाळा व कॉलेजेस यांना मेन गेट वरती लावण्यासाठी असे असे फलक देण्यात आले. बर मीटर अंतरामधील पांढरा तसेच किराणा मालाचे दुकान यांना तंबाखूजन्य पदार्थ यांची विक्री करण्यास मनाई असले बाबत लेखी सूचना देण्यात आल्या तसेच विक्री करताना मिळून आल्यास कोटपा कायद्यान्वये कायदेशीर कारवाई करण्यात येईल याबाबत वरिष्ठांच्या आदेशाने वेळ नोटीस देण्यात आली सदर मोहिमेमध्ये कोटपा कायदा अन्वये 56 कोटपा कारवाया करण्यात आल्या असून बीएमसी च्या मदतीने एका पांडप्रीचे संपूर्ण निष्काशन करण्यात आलेले आहे.
तसेच एका पान टपरी व्यावसायिकाने त्याचा व्यवसाय पूर्ण बदलून त्या ठिकाणी लहान मुलांच्या खाऊचे तसेच स्टेशनरीचे पदार्थ त्याच्या दुकानांमध्ये विकण्यास ठेवलेले आहे.मोहिमेबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती होण्याकरिता तसेच सामान्य जनतेमध्ये सुद्धा तंबाखूजन्य पदार्थ तसेच आमले पदार्थांच्या सेवनाचे दुष्परिणाम बाबत माहिती होण्याकरता ठीक ठिकाणी महिलांचे तसेच पुरुषांच्या कॉर्नर मिटिंग घेऊन याबाबत मार्गदर्शन करण्यात आले शाळांमध्ये एनजीओच्या मदतीने विद्यार्थी तसेच पालक यांच्या मीटिंग घेऊन त्यांना अमली पदार्थांच्या किंवा तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाच्या दुष्परिणाम बाबत माहिती देऊन मोठ्या प्रमाणामध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न केलेला आहे. शाळा परिसरामध्ये कोणीही तंबाखूजन्य पदार्थांचे किंवा सिगारेटचे सेवन करताना मिळून आल्यास 112 या हेल्पलाइन क्रमांकावर ती संपर्क साधून तक्रार करण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आलेले आहेत.
कांजूरमार्ग पोलीस ठाणे हद्दीत जानेवारी 2025 पासून तंबाखूमुक्त शाळा व कॉलेज परिसर ही मोहीम निर्भया पथकाच्या निर्भया अधिकारी पोलीस उपनिरीक्षक शितल बाबर यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणात हद्दीमध्ये मोहिमेबाबत जनजागृती केली . पोलीस स्टेशन कडून यासाठी प्रकारच्या कार्यक्रमाच्या आयोजन करण्यात आले शाळा प्रशासन तसेच पालकांकडून मोठ्या प्रमाणामध्ये या कार्यक्रमाला प्रतिसाद मिळाला तसेच त्यांच्याकडून या मोहिमेचे स्वागत करण्यात आलेले आहे. विमंडळ सात मधील घाटकोपर, पंतनगर, विक्रोळी, पार्कसाईट, भांडुप मुलुंड , नवघर पोलीस ठाण्यांमध्ये 295 शाळा व कॉलेजमधील परिसर हा तंबाखूमुक्त करण्यात आलेला आहे. परिमंडळ 07 चे माननीय पोलीस उपायुक्त विजयकांत सागर यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या ” तंबाखूमुक्त शाळा व कॉलेज परिसर” या मोहिमेला परिमंडळ सात मधील स्थानिक नागरिक शाळा व कॉलेज प्रशासनाकडून खूप चांगला प्रतिसाद मिळालेला आहे.