सांगलीत एमडी बनवणाऱ्या कारखान्यासह मुंबई गु.प्र. शाखा कक्ष-७ ने एकुण २५६ कोटी २ लाख ६ हजार ६२० रूपयांचा मुद्देमाल केला जप्त..

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

मुंबई:– मुंबई : मुंबई पोलीस दलाच्या गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष ७ च्या पथकाने सांगलीत सुरू असलेल्या एमडी कारखान्याचा पर्दाफाश केला. या कारवाईत २५२.२८ कोटी रुपयांचे १२६१४१ कि.ग्रॅ. एमडी. (मेफेड्रॉन) जप्त करण्यात आले असून ९ पुरुषांना व एका महिलेला बेड्या ठोकण्यात आल्या. या कारखान्यात तयार केलेला ड्रग्ज महामुंबईत विकला जात होता. या कारवाईदरम्यान युनिट ७ ने ३ कोटी ४६ लाख ६८ हजार २०० रुपये जप्त केले आहेत.

शहर ड्रग्जमुकतीच्या अनुषंगाने मुंबई पोलीस दलाच्या पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी सर्व विभागांना अवैध धंद्यांसह कायदा व सुव्यवस्था टिकवून ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार प्रत्येक पोलीस ठाणे व गुन्हे प्रकटीकरण विभागांची सर्व पथके आपापल्या परीने विशेष मोहीम राबवत आहेत. याचाच एक भाग म्हणून गुन्हे शाखा कक्ष ७ चे पथकाची शोधमोहीम सुरू असताना चेंबूर-सांताक्रूझ लिंक रोडवरील सीएसटी रोडच्या फुटपाथवर सापळा लावून एका महिलेला ताब्यात घेण्यात आले. तिच्याकडे ६४१ ग्रॅम वजनाचा एम.डी. (मेफेड्रॉन) व अंमली पदार्थाचे व्यवसायामधुन मिळविलेले १२.२० लाख व २५ ग्रॅम (कि. अं.रू. १,५०,४२०/-) सोन्याचे दागिणे जप्त करण्यात आले. या प्रकरणी कुर्ला पोलीस ठाण्यात (गु.र.क्र. ६७/२०२४, कलम ८ (क), २२(क), २९) गुन्हा नोंद करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास युनिट ७ करू लागले. चौकशीदरम्यान तिने एम.डी. देणाऱ्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानुसार मिरा रोड येथील एका इसमाला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून ६ कोटी रुपयांचे ३ किलो एम.डी. व ३ लाख ६८ हजारांची रोकड जप्त करण्यात आली. त्याने हे एम. डी. गुजरातमधील सुरत येथे राहणाऱ्या २ व्यक्तीकडून घेतल्याचे सांगितले. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्या दोघांनाही ताब्यात घेतले. या गुन्ह्याचा तपास चाल असताना आरोपीतांकडे व साक्षीदारांकडे केलेल्या चौकशीवरून तांत्रिक तपासाद्वारे एम डी. बनविणाऱ्या कारखान्याचा शोध घेतला आणि २५ मार्च रोजी सांगली जिल्ह्यातील कवठे महाकाल पोलीस ठाण्याच्या हद्दीत इरळी या गावात धाड टाकली. या कारवाईत २४५ कोटींचे १२२.५०० कि.ग्रॅ. एम.डी. तसेच एम.डी. बनविण्यासाठी वापरणारे साहित्य व वाहन ताब्यात घेतले. सदर कारवाईमध्ये ६ जणंच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या.

सदर गुन्ह्याचा तपास वालु असताना आरोपीतांकडे व साक्षीदारांकडे केलेल्या चौकशीवरून तसेच तांत्रिक तपासाव्दारे आणि पोलीस पथकाने वेगवेगळ्‌या ठिकाणी पाळत ठेवुन प्राप्त माहितीच्या आधारे दिनांक २५ मार्च २०२४ रोजी सांगली जिल्ह्यातील कवठे महाकाल पोलीस ठाणे हद्दीत इरळी या गावात धडक कारवाई करून एम.डी. हा अंमली पदार्थ बनविणाऱ्या कारखान्याचा शोध घेऊन एकूण १२२.५०० कि.ग्रॅ. वजनाचा एम.डी. (मेफेड्रॉन) हा अंमली पदार्थ (अं. कि. रू. २४५ कोटी) तसेच एम. डी. बनविण्यासाठी वापरण्यात येणारे साहीत्य व गुन्हयात वापरलेले वाहन ताब्यात घेतले. सदर कारवाईमध्ये एकुण ०६ पुरूष आरोपीतांना अटक करण्यात आली असुन त्यांना मा. न्यायालयाने सदर आरोपीना दिनांक ०३/०४/२०२४ रोजीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

या गुन्ह्याच्या तपासादरम्यान मुख्य आरोपीने ड्रग्ज विकून कमावलेले ३ कोटी ४६ लाख ६८ हजार २०० रूपये ठाणे जिल्ह्यातीलभिवंडी येथील घरात लपवून ठेवल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार कारवाई करून पोलिसांनी सदर रोकड जप्त केली.

या कारवाईत आतापर्यंत १२६ किलो ६४१.५ ग्रॅम एम.डी. (मॅफेड्रॉन) हा अंमली पदार्थ किंमत २५२,२८,००,०००/- रूपये, २५.०७ ग्रॅम सोन्याचे दागिने किंमत १,५०,४२०/- रूपये, गुन्हयात वापरलेली स्कोडा कंपनीची कार किंमत १०,००,०००/- रूपये तसेच रोकड एकूण २५६ कोटी २ लाख सहा हजार सहाशे वीस रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कौतुकास्पद कारवाई पोलीस आयुक्त, विवेक फणसळकर, मा. विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, मा. पोलीस सह आयुक्त (गुन्हे) लखमी गौतम, मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) शशी कुमार मिना, मा. पोलीस उप आयुक्त (प्रकटीकरण) दत्ता नलावडे, मा. पोलीस उप आयुक्त (प्रकटीकरण-१) विशाल ठाकूर, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त (डि-पूर्व) चंद्रकांत जाधव यांचे मार्गदर्शनाखाली कक्ष-७, गु.प्र.शा., गु.अ.वि., घाटकोपर, मुंबई चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तावडे, पो.नि. आत्माजी सावंत, म.पो.नि. राजश्री बाळगी, पो.नि. निरज उबाळे, म.पो.नि. स्वप्ना शहापुरकर, स.पो.नि. अमोल माळी (कक्ष-५), पो.उ.नि. रामदास कदम, पो.उ.नि. स्वप्निल काळे, पो. 3.नि. महेश शेलार, पो.उ.नि. नामदेव परबळकर, म.स. फौ. निधी धुमाळ, म.स. फौ. स्नेहा नाईक, स. फौ. अरूण सावंत, स. फौ. तानाजी उबाळे, पो.ह.क्र. ३१३४७/दिपक पवार, पो.ह.क्र. ३२८०७/संतोष गुरव, पो.ह.क्र.३४३४४/प्रदीप बडगुजर, पो.ह.क्र.९६०१८३/ सुभाष मोरे, पो.ह.क्र. ९६०५५२ / शशिकांत कांबळे, पो.ह.क्र.९६०६३३/अजय बल्लाळ, पो.ह.क्र.९७०६५१/गिरीष जोशी, पो.ह.क्र.९७०९४४/अस्लम शेख, पो.ह.क्र.००३५१/विनोद शिरापुरी, पो.ह.क्र.०३८३५/प्रमोद जाधव, पो.ह.क्र.०४०५६५/प्रकाश भोई, म.पो.ह.०५०५५८/सिमा तिरोडकर, पो.ना.क्र. ०६१९४०/विलास राऊत, पो.शि.क्र.०७१०७४/ प्रमोद शिंदे, पो.शि.क्र.०८०५००/लुकमान सय्यद, पो.शि.क्र.०९०४६४/महेश सावंत, पो.शि.क्र.०९०५७२/जितेंद्र पाटील, म.पो.शि.११२१५३/हिना शेख, पो.ह.चा.००६८८/राजाराम कदम, पो.शि. चा. १५०८६३/दिलिपराव राठोड यांनी केली.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट