मुबंई गोवा महामार्गालां यमराजाचा विलखा सतत होणाऱ्या अपघातमध्ये नागरिक त्रस्त 2 मोटार सायकल स्वार जागीच ठार…

0
Spread the love

प्रतिनिधी-सचिन पवार

माणगांव : दिनांक.15 जानेवारी 2023

माणगांव :-मुबंई गोवा महामार्गवर माणगांव तालुक्यातील तिलोरे गावच्या हद्दीत दुचाकी स्वार व कंटनेर चा अपघात अपघातात दुचाकीवर असणारे दोघेजन जागीच ठार मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी त्याच्या ताब्यातील स्विफ्ट डिजायर क्रमांक एम एच 06 बी ई 7177 ही स्वतः चालवीत माणगांव बाजूकडे जात असताना माणगांव बाजूकडून येणारा कंटनेर क्रमांक एम एच 46 बी एम 0676 यावरील अज्ञात चालक याने त्याच्या ताब्यातील कंटनेर रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगात चालवीत घेऊन जात असताना समोरून माणगांव बाजूकडून चालणारी मोटारसायकल क्रमांक एम एच 02 ई जी 1385 यास ठोकर मारून फरार झाल्याची घटना काल दि.14/1/23 रोजी घडली आहे.

या घटनेची खबर माणगांव पोलीस ठाण्यात समजतात माणगांव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील वसह पो. नि.लहागे घटनास्थळी दाखल झाले ही घटना दि.15/1/23 रोजी रात्री 1 वाजण्याच्या सुमारास मौजे तिलोरे गावच्या हद्दीत घडली असून दुचाकीवर असलेले मयत इसम विशाल संजय सकपाळ वय वर्ष 34 रा. ओम साई चाल रूम नं.04 दिवा आगसन रोड बेडकर नगर दिवा पूर्व, राजेश राजाराम धामणकर वय वर्ष 30 रा. साई निवास एस आर के सहकारी ग्रहनिर्माण संस्था सिद्धार्थ नगर खार ईस्ट हे दोन्हीही इसम मयत झाले असून कंटनेर चालका विरुद्ध कॉ. गु रजि नं.09/2023 भा द वी स कलम 304अ 279,337,338 मो वां का कलम 184,134 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून अज्ञात वाहन चालकाचे नावं माहित नसून पुढील तपास उप विभागीय पोलीस अधिकारी रोहा अतिरिक्त कार्यभार माणगांव किरण कुमार सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनखाली माणगांव पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, सह पोलीस निरीक्षक लहागे हे करीत आहेत.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट