मुबंई गोवा महामार्ग बनलाय मृत्यूचा सापळा पुन्हा एकदा कशेने गावच्या हद्दीत ऍक्टिवा व टेम्पोच्या अपघातात तरुण ठार…

प्रतिनिधी सचिन पवार
माणगांव: माणगांव तालुक्यातील कशेने गावच्या हद्दीत पुन्हा एकदा ऍक्टिवा स्वारचा अपघात अपघातात मयत करण वाघमारे वय वर्ष ३१ रा. थरमरी आदिवासीवाडी , पो.शिरवली निजामपूर ता.माणगांव रायगड या युवकांचा मृत्यू झालं आहे. हा युवक इंदापूर बाजूकडून माणगांव बाजूकडे जात असताना रस्त्याचे परिस्थितीकडे दुर्लक्ष करून तसेच अयगयीने अविचाराने स्पीड ने स्कुटी ओव्हरटेक करून समोरून येणारा टेम्पो क्रमांक जी ए ०३ए एच ७३७२व ऍक्टिवा स्कुटी क्रमांक एम एच ०६ ए एच १३१६ याचा समोरा समोर अपघात झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की मयत करण वाघमारे हा मुबंई गोवा महामार्गवरून इंदापूर बाजूकडून माणगांव बाजूकडे जात असताना मौजे कशेने गावाच्या हद्दीत गेला असता त्याच्या ताब्यातील ऍक्टिवा स्कुटी ओव्हरटेक करत समोरून येणारा टेम्पो याच्यावर जाऊन आदल्याने मयत इसम करणं बारकू वाघमारे गंभीर दुःखापतीस रस्त्याच्या बाजूला फेकला गेला असता त्याच्या डोक्याला व शरीराला गंभीर दुखापत होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला आहे.या घटनेची खबर माणगांव पोलीस ठाण्यात समजतात माणगांव पोलीस ठाण्याचे माणगांव पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील घटनास्थळी पोचले असता मिळालेल्या माहितीनुसार मयत इसम हा इंदापूर येथे विट्टभट्टी मालक विलास शिंदे यांच्या येथे कामाला होता फिर्यादी इसम किरण कुमार पांडे वय वर्ष ४७ रा रामदेव नगर नावागाम दिंडोली सुरत शहर गुजरात हा आपल्या ताब्यातील टेम्पो मडगाव ते सुरत अशा प्रकारे घेऊन जात असताना मुबंई गोवा हायवे वरील माणगांव येथील मौजे कशेने गावाच्या हद्दीत आला असता हा अपघात झाला आहे असे नमूद केला कशेने गावच्या हद्दीत ऍक्टिवा क्र. एम एच ०६ सि एच १३१६ या स्कुटी ने अतिवेगाने व रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून ऍक्टिवा चा बॅलन्स न सावरता टेम्पो वर येऊन आदलला या कारणाने मयत इसम खाली पडल्याने त्याच मृत्यू झालं आहे.या अपघातातची नोंद माणगांव पोलीस ठाण्यात कॉ गु रजि नं १२/२०२३ भा. द. वि क ३०४ अ २७९,३३७,३३८ मो. वा. का. कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास माणगांव पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील याच्या मार्गदर्शनाखाली सह पोलीस निरीक्षक मोहिते, व पो. ना. खिरीट हे करीत आहेत.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com