मुबंई गोवा महामार्गावर माणगांव तालुक्यातील रातवड गावच्या हद्दीत भिषण अपघात, अपघातात एकाचा जागीच मृत्यू

0
Spread the love

प्रतिनिधी -सचिन पवार

माणगांव :-मुबंई गोवा महामार्गावर आज पहाटे ५ च्या सुमारास ऑटो रिक्षा व अज्ञात आयसार टेम्पो यांच्यात भिषण अपघात झाला असून एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. ऑटो रिक्षा क्रमांक एम एच ४८ बी एफ ५८६३ ही विरार ते माणगांव पहेल असा मुबंई गोवा हायवे ने येत असताना समोरून येणारा अज्ञात टेम्पो रॉंग साईड ने माणगांव बाजूकडून मुबंई बाजूकडे जाणारा एक ताबडया रंगाचा आयसार टेम्पो नंबर माहिती नाही हा भरधावं वेगाने चालवून रिक्षा ला ठोकर मारून अपघात केला.यांच्यामध्ये फिर्यादी पंढरी हरी पहेलकर वय वर्ष ४७ रा. ए विंग ३०१ कमळजा अपार्टमेन्ट मनवेल पाडा विरार मुबंई व सुनीता पंढरी पहेलकर वय वर्ष ३९ दोन्ही रा. विरार हे जखमी झाले आहेत तर मयत स्वप्नील अनंत पहेलकर वय वर्ष ३३ रा. ओम साई चाल आचोल रोड केसरी पार्क नालासोपारा पूर्व मूळ गांव पहेल ता. माणगांव रायगड याला गंभीर स्वरूपात दुःखापत होऊन मयत झाला आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असं की फिर्यादी यांच्या ताब्यातील ऑटो रिक्षा क्र. एम एच ४८ बी. एफ.५८६३ ही मुबंई विरार ते पहेल असा मुबंई गोवा हायवेने स्वतः चालवीत घेऊन जात असताना मौजे रातवड गावच्या हद्दीत आलं असताना गोवा बाजूकडून एक ताबड्या रंगाचा आयसार टेम्पो क्रमांक माहिती नाही वरील अज्ञात चालकांनी रॉंग साईडला येऊन आपल्या ताब्यातील टेम्पो हयगयीने बेकायदेशीर रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून अविचाराने भरधाव वेगात चालवून फिर्यादी यांच्या ताब्यातील ऑटो रिक्षा हिला समोरून जोरात ठोकर मारून अपघात केला ऑटो रिक्षा मधील फिर्यादी इसम व त्याची पत्नी यांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांचा पुतण्या स्वप्नील अनंत पहेलकर वय वर्ष ३३ याला गंभीर स्वरूपात दुखापत होऊन तो मरण पावला.या घटनेची खबर माणगांव पोलीस ठाण्यात समजतात माणगांव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेद्र पाटील यांच्या मार्गदर्शनखाली आरोपी अज्ञात आयसार टेम्पो यांच्या विरोधात कॉ गु रजि नं १२१/२०२३ भा द वि स कलम ३०४(अ )२७९,३३७,३३८मो वा क अधी १८४,१३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आलं असून पुढील तपास पो. हवालदार दोंडकुलकर, पो. हवालदार कोळेकर हे अधिक तपास करीत आहेत.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट