मुंबई गोवा महामार्गावर धामणदेवी येथे ईरटीगा चालकाचा ताबा सुटल्याने खोल दरीत कोसळुन अपघात…

0
Spread the love

प्रतिनिधी-राकेश देशमुख

महाड: मंगळवार दिनांक ०६/१२/२०२२ रोजी सकाळी ०८:१५ वाजण्याचे दरम्याने मुंबई गोवा महामार्ग क्रमांक ६६ धामणदेवी दत्तवाडी तालुका पोलादपूर या ठिकाणी घाटकोपर ते पळचील जाणारी कार ईरटीका क्रमांक MH-03-BJ-0671 वरील चालक सतीश जगताप वय-३५ वर्ष रा.संभाजीनगर कुर्ला मुंबई यांचा वाहनावरील ताबा सुटल्याने रस्त्याच्या डाव्या बाजूस रस्ता सोडून खाली उतरून दरीमध्ये पलटी होऊन अपघात झालेला आहे.

सदर वाहनांमध्ये वाहन चालकासोबत ७ इसम प्रवास करीत होते यामध्ये चालक सतीश जगताप वय -३५ वर्ष यांना गंभीर दुखाप झाली आहे १) दिपाली कर्नाले वय ६५, २) दामोदर कर्नाले वय ७०,३) साक्षी कर्नाले वय ४२,४) स्वराज कर्नाले वय१२,५) राजेश कर्णाले ३८ वरील एक ते पाच यांना किरकोळ दुखापत झालेली असून या सर्वांना तात्काळ ग्रामीण रुग्णालय पोलादपूर येथे औषधा उपचार करता दाखल करण्यात आले आहे. अपघातात वाहनाचे मोठे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अपघाताची घटनास्थळी वाहतूक सुरुळीत चालू आहे.

यावअपघाताची माहिती कारवाई पूर्ण-१०.१५ केल्यानंतर श्री. ए.पी.चांदणे पोलीस उपनिरीक्षक कशेडी यानी दिली.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट