मुंबई गोवा हायवेवर कशेडी येथे मच्छीने भरलेला ट्रक चालकाचा ताबा सुटून १० फुट खोल नाल्यात पलटी…

0
Spread the love

उपसंपादक-राकेश देशमुख

खेड :- मुंबई गोवा हायवे रोड 66 मोपो केंद्र कशेडी हद्दीत उधळे खुर्द या ठिकाणी मुंबई ते गोवा मच्छी भरलेला अशोक लेलँड ट्रक नंबर kA20 AA7059 हा चालक आजमल पूर्ण नाव माहीत नाही साडेसहा दरम्याने उधळे या ठिकाणी आला असता ट्रक वरील ताबा सुटल्याने ट्रक रस्त्याच्या साईटला असलेल्या मोरी खाली हा दहा फूट खोल नाला मध्ये जाऊन पलटी झाला.

अपघातामुळे चालक व सोबत असलेला सानसिंग लालसिंग वय 26 रा. उन्माव कटरा यांना डोके हातापायाला दुखापत झाल्याने उपजिल्हा रुग्णालय कळवणी खेड येथे उपचाराकरता दाखल झाले आहेत सदरचा अपघात खेड पोलीस ठाण्याचे अंमलदार करत असून माहिती उशिरा मिळाल्याने घटनास्थळी व उपजिल्हा रुग्णालय कळवण येथे जाऊन माहिती घेण्यात आली आहे. अपघातातील वाहन रस्त्याच्या साईडला असून वाहतूक सुरळीत चालू आहे अशी माहिती एस व्ही सुर्वे पोलीस उपनिरीक्षक कशेडी यांनी दिली.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट