मुंबई गोवा चौपदरी महामार्गाला ‘स्वराज्य’ राष्ट्रीय महामार्ग नाव द्यावे भाजपा सरचिटणीस महेश शिंदे यांची मागणी…

0
Spread the love

प्रतिनिधी राकेश देशमुख

महाड : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ चे काम अंतिम टप्प्यात असून, या महामार्गाला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ‘स्वराज्य’ राष्ट्रीय महामार्ग असे नामांतर करावे अशी मागणी भाजपाचे महाड तालुका सरचिटणीस महेश शिंदे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे केली आहे.
समृद्धी महामार्गा प्रमाने नव्याने होणार्या व कामच्या अंतिम टप्प्यात असलेल्या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ हा कोकणांती छ. शिवाजी महाराज यांच्या गडकोट किल्ले, समुद्र दुर्ग आणि स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड सह महाराजांच्या समाधीला वंदन करीत असुन, या महामार्गाने प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला स्वराज्याची महती समजावी या साठी या महामार्गाला ‘स्वराज्य’ राष्ट्रीय महामार्ग असे नामांतर करावे अशी मागणी भाजपाचे महाड तालुका सरचिटणीस महेश शिंदे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. याच सोबत त्यानी महाड-मढेघाट-वेल्हे-पाबेघाट-खानापूर मार्गे पुणे या मार्गाला पर्यटन महामार्ग म्हणून विकसित करावा अशी मागणी देखील केली आहे. महाड मध्ये २२ जुलै २०२१ रोजी आलेल्या महापुराचे पाणी पहाता नव्याने रुंदीकरण व काॅंक्रीटीकरन होणार्या महाड रायगड मार्गाची उंची वाढणार आहे. मौजे लाडवली पासून मौजे नाते पर्यंत या भागातील पुराच्या पाण्याचा व्यवस्तित निचरा होण्यासाठी या मार्गावरील सिमेंट पाईप मोर्यांऐवजी स्लॅप ड्रेन व छोटे पुल बांधण्यात यावेत असे देखील त्यांनी यावेळी सुचवीले. महेश शिंदे यांच्या मागणीची दखल घेत केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी तुमची मागणी योग्य असुन मी याबाबत योग्य तो पाठपुरावा करणे असे अश्वासीत केले.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

dipakbhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट