मुंबई गुन्हे शाखा युनिट- ११ ने गोरेगाव येथील रॉयल पाम्स येथून बनावट काॅल सेंटरचा केला पर्दाफाश..

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

मुंबई:– गोरेगाव येथे कथितरित्या कार्यरत असलेल्या बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश गुन्हे शाखा युनिट -११ यांनी केला आणि कॅनडाच्या नागरिकांची फसवणूक करणाऱ्या ७ जणांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी ॲमेझॉन आणि कॅनडाच्या ॲटर्नी जनरल ऑफिसचे प्रतिनिधी असल्याच्या नावाखाली कॉल करण्याचे भासवून लोकांची फसवणूक केली आहे.

मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट -११ ला गोरेगावच्या आरे कॉलनी भागात रॉयल पाम्स येथून झोहो टेक सोल्यूशन नावाने कथित बनावट कॉल सेंटर सुरू असल्याची माहिती मिळाली आणि पोलीसांनी छापा टाकून ७ जणांना ताब्यात घेतले.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट