यूपीत स्वरक्षणासाठी पिस्तुलींचा परवाना घेऊन मुंबई, ठाण्यात बॉडीगार्ड पुरवणाऱ्यांचा पर्दाफाशमुंबई गुन्हे शाखा, कक्ष-६ च्या पथकाची उत्तम कारवाई…

उपसंपादक-रणजित मस्के
मुंबई:– यूपीत स्वरक्षणाचा परवाना मिळवून मुंबई व ठाण्यात बेकायदेशीररित्या बॉडीगार्ड म्हणून सुरक्षा पुरवणाऱ्यांचा पर्दाफाश करण्यात आला. ही उत्तम कारवाई मुंबई पोलीस दलाच्या गुन्हे प्रकटीकरण कक्ष ६ च्या पथकाने केली. या आरोपींविरुद्ध नेहरूनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेहरूनगर येथे काही जण संरक्षणासाठी असलेल्या पिस्तुलांद्वारे खासगी बॉडीगार्ड म्हणून लोकांना सुरक्षा पुरवत असल्याची माहिती युनिट ६ च्या पथकाला समजली. त्या माहितीच्या आधारे कुर्ला पूर्व परिसरातील त्रिवेणी बार समोर सापळा लावून अनिलकुमार विजय नारायण मिश्रा (वय ५३ वर्षे), राजकुमार लालता सिंग (वय ५२ वर्षे), देवनारायण हरीराम जैस्वाल (वय ४८ वर्षे, सर्व रा. मुळ उत्तर प्रदेश) यांना ताब्यात घेण्यात आले.
चौकशीदरम्यान त्यांच्याकडे आढळलेली पिस्तुलांचा परवाना यूपीतला असून त्यांनी स्वत:च्या रक्षणासाठी हे परवाने घेतल्याचे समजले. या शस्त्रांचा वापर करून गेल्या १० वर्षांपासून मुंबई व ठाण्यात खासगी व्यक्तींना बॉडीगार्ड म्हणून सुरक्षा पुरवत होते, अशी माहिती तपासादरम्यान निष्पन्न झाली.
या प्रकरणी कलम ३० शरत्र अधिनियम १९५९ अन्वये नेहरूनगर पो. ठाणे येथे गु.र.क. ११७/२०२४ रोजी गुन्हा नोंद करण्यात करण्यात आला असून या गुनह्याचा तपास पोउपनि सुभाष मुठे करीत आहेत. ही कारवाई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, पोलीस सह आयुक्त (गुन्हे) लखमी गौतम, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) शशिकुमार मीना, पोलीस उपायुक्त (प्रकटीकरण-१) विशाल ठाकूर व सहाय्यक पोलीस आयुक्त (डी पुर्व) चंद्रकांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कक्ष ६ चे प्रभारी पोलीस निरीक्षक रविंद्र साळुंखे, पोलीस निरीक्षक प्रशांत पवार, पोलीस उपनिरीक्षक सुभाष मुठे, पोलीस उपनिरीक्षक सावंत, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक देसाई, हवालदार रिदी, चव्हाण, अंमलदार इंगळे, कोळेकर, घेरडे, पाटील यांनी केली.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com