एमडी तस्करी प्रकरणी महिला व पुरुषाला मुंबई गुन्हे शाखा कक्ष १२ ने अटक करुन ४२ लाखांचे ड्रग्ज केले जप्त…

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

मुंबई:- ड्रग्ज बाळगणाऱ्या एका महिला व पुरुषाला रंगेहात पकडण्यात आले. ही कारवाई मुंबई गुन्हे शाखा कक्ष १२ च्या पथकाने केली. या कारवाईदरम्यान ४२ लाख ७५ हजार रुपयांचा २८५ ग्रॅम वजनांचा मेफेड्रॉन ड्रग्ज (एम.डी.), रोख रक्कम १ लाख ११ हजार ५०० रुपये व डिजीटल वजन काटा जप्त करण्यात आला.

मुंबई गुन्हे शाखा, कक्ष- १२ च्या पथकाने ३ मार्च २०२४ रोजी पहाटेच्या सुमारास गोरेगाव पूर्व परिसरातील बी.एम.सी कॉलनी येथील संतोष नगरातल्या सार्वजनिक शौचालयाजवळ सापळा लावून ३९ वर्षीय महिला व मोहम्मद हनिफ रफिक खान (वय ४८ वर्षे) यांना ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याजवळ ४२ लाख ७५ हजार रुपयांचा २८५ ग्रॅम वजनांचा ‘मेफेड्रॉन’ (एम.डी.), रोख रक्कम १ लाख ११ हजार ५०० रुपये व डिजीटल वजन काटा आढळून आला.

या प्रकरणी त्यांच्या विरोधात (गुन्हा नोंद क. १७/२०२४) कलम ८ (क), २२ (क), २९ एन. डी. पी.एस. कायदा १९८५ (दिंडोशी पोलीस ठाणे वि.स्था.गु.नॉ.क्र. १९५/२०२४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर आरोपींना अटक करण्यात आली आहे.

जप्त केलेला अमली पदार्थ कोठून आणला, कोणास विक्री करणारे होते? याचा तपास करण्यासाठी आरोपींना ७ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून या गुन्ह्याचा तपास कक्ष १२चे पथक करीत आहेत.

ही कामगिरी पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, पोलीस सह आयुक्त (गुन्हे), लखमी गौतम, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), शशिकुमार मिना, पोलीस उप आयुक्त (प्रकटीकरण-१), विशाल ठाकुर, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त (प्र-उत्तर), काशिनाथ चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक नवनाथ जगताप, स.पो.नि सावंत, स.पो.नि रासकर, हवालदार लक्ष्मण बागवे, सुनिल चव्हाण, शैलेश बिचकर, विशाल गोमे, प्रसाद गोरूले, म.पो.ह.क. कदम (नेमणुक कक्ष-११), महिला अंमलदार खाडे (नेमणुक कक्ष-१०) यांनी केली आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट