बनावट व्हिझाद्वारे भारतातील बेरोजगारांंची फसवणुक करणा-या आंतरराज्यीय टोळीस पश्चिम बंगाल येथून ४८२ पासपोर्टसह मुंबई गुन्हे शाखेने केली अटक…

0
Spread the love

प्रतिनिधी- महेश वैद्य

मुंबई:-यातील अटक आरोपीत यांनी परदेशात नोकरीस इच्छुक असलेल्यांची फसवणुक करण्याचे उद्देशाने मुंबई येथे बॉम्बे इंटरनॅशनल कन्सलटन्सी व इंडियन ओव्हरसीज या नावाने प्लेसमेंट एजन्सी कार्यालय उघडून भारतातील विविध राज्यातील तरूणांना अझरबैझन, ओमान, दुबई, सौदी अरेबीया, कतार व रशिया या परदेशातील वेगवेगळया नामांकित कंपनीत नोकरी देण्याचे आमिष देवून तरूणाकडून त्यांचे पासपोर्ट मुंबईतील वेगवेगळया कार्यालयात जमा करून घेतले. त्यानंतर तरुणांना वेगवेगळया परदेशातील नामांकित कंपन्यांचे बनावट ऑफर लेटर व संबंधित देशांचा बनावट वर्क व्हिझा व्हॉट्स अॅपव्दारे पाठवून त्यामोबदल्यात तरूणांकडून प्रत्येकी ४० ते ६० हजार रूपये वेगवेगळया बँक खात्यावर स्विकारले.

अशाप्रकारे आरोपीतांनी ब-याच तरूणांकडून पैसे स्विकारल्यानंतर तरुणांना कोणत्याही प्रकारची नोकरी न देता किंवा त्यांचे पैसे व पासपोर्ट परत न करता तरूणांची फसवणूक करून सी. एस. टी. व अंधेरी, मुंबई येथील कार्यालय बंद करून परागंदा झाले होते. त्यानंतर यातील फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून एम. आर. ए. मार्ग पोलीस ठाणेस गु.र.क्र. २३९ / २३ अन्वये दाखल सदरचा गुन्हा गु.प्र.शा., गु.र. क्र. ६६ / २३ भा.दं.वि. कलम ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१, १२०(ब) सह भारतीय उत्प्रवासी (Immigration) अधिनीयम कलम १०, २४ सह कलम १२ (१) (ब) पासपोर्ट अधिनियम, सह ६६ (क) (ड) माहिती तंत्रज्ञान अधिनियम प्रमाणे गुन्हे शाखा कक्ष ५ कडे पुढील तपासाकरीता वर्ग करण्यात आला होता.

                    गुन्हयाचा विस्तार व गांभीर्य ओळखुन मा. पोलीस सह आयुक्त श्री लखमी गौतम यांचे मार्गदर्शनाखाली एकुण ०५ पोलीस पथके स्थापन करून एकुण ५ आरोपीतांना यापुर्वी दिल्ली, जिल्हा लखनौ, राज्य उत्तरप्रदेश, जिल्हा गया, राज्य बिहार, भिवंडी महाराष्ट्र येथून अटक करण्यात आले होते. यापुर्वी अटक आरोपीतांकडून १) बळीत व्यक्तींचे एकूण ६२ पासपोर्ट, (२) अझरबैझन देशाचे एकूण ०७ बनावट व्हिझा, स्टिकर्स व कागदपत्रे, २) ५ संगणक व संगणकीय साहीत्य कलर प्रिंटर, (३) ०५ लॅन्डलाईन फोन व ०७ मोबाईल फोन - इंटरनेट कनेक्शन राउटर, (४) विविध कंपन्याचे १४ मोबाइल सीम कार्ड, (५) ०३ विविध रबरी शिक्के, ८) विविध बँकांचे १० डेबीट कार्ड, ०६ चेकबुक व पासबुक असे गुन्हयात वापरण्यात आलेले साहित्य हस्तगत करण्यात आले होते.

                    दि. ०९/१२/२०२३ रोजी नमूद गुन्हयातील मुख्य पाहिजे आरोपीतांना पश्चिम बंगाल या राज्यातून सापळा रचुन अटक केले व त्यांना मा. न्यायालयासमक्ष रिमांड कामी हजर करून त्यांची पोलीस कोठडी प्राप्त करण्यात आली. पोलीस कोठडी दरम्यान नमूद आरोपीतांकडून बळीत व्यक्तींचे एकूण ४८२ मूळ पासपोर्ट जप्त करण्यात आले आहेत. अशाप्रकारे सदर गुन्हयात अद्यापर्यंत एकूण ७ आरोपीतांना अटक करून बळीत व्यक्तींचे एकूण ५४४ पासपोर्ट हस्तगत करण्यात कक्ष ५ कार्यालयास यश प्राप्त झाले आहे. तसेच आरोपीतांचे विविध २६ बँकेतील खाती गोठविण्यात आली आहेत.

आरोपीतांची नावे व पत्ते :-

१) पतित पबन पुलीन हालदर, वय – ३६ वर्षे, रा. ठि- नॉर्थ २४, परगणा, पश्चिम बंगाल.

२) मोहम्मद ईलीयास अब्दुल सत्तार शेख मन्सुरी, वय ४९ वर्षे, रा. ठि. कमरहाटी, पश्चिम बंगाल

            सदरची यशस्वी कामगिरी मा. पोलीस आयुक्त, मुंबई, श्री. विवेक फणसळकर, मा. विशेष पोलीस आयुक्त, मुंबई, श्री. देवेन भारती, मा. पोलीस सह आयुक्त (गुन्हे), मुंबई, श्री. लखमी गौतम, मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. शशीकुमार मीना, मा. पोलीस उप आयुक्त (प्रकटीकरण- १), श्री. राज तिलक रौशन, मा. सहा. पो. आयुक्त (मध्य), श्री. दत्तात्रय नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कक्ष ५ चे प्र. पो. नि. घनश्याम नायर, पो. नि. सदानंद येरेकर, पो. नि. सुनित भोर, पो. नि. अजित गोंधळी, सपोनि अमोल माळी, सपोनि जयदीप जाधव, पोउपनि विजय बेंडाळे, सपोउपनि रविंद्र राणे, पो. ह. धनंजय पैगंणकर, पो.ह. तानाजी पाटील, पो.ह. सुनिल जाधव, पो.शि. सरफरोज मुलाणी, पो.शि. भाउसो पवार, म.पो.शि. शुभांगी पाटील व चालक पो.ह. हरेश कांबळे यांनी केली आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *