मुंबईतील नागरीकांच्या मदतीसाठी टॅक्सी काॅडची निर्मीती
सह संपादक -रणजित मस्के
मुबई
मुंबईमध्ये मोठ्या संख्येने टॅक्सीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना टॅक्सी चालकांकडून भाडे नाकारणे, उद्दामपणाची वागणूक , जास्तीचे भाडे आकारणे अशा अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. या तक्रारींतुन मार्ग काढण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे अप्पर परिवहन आयुक्त श्री भरत कळसकर साहेब यांच्या संकल्पनेतून प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (मध्य ) येथे टॅक्सी प्रवासी मदत पथक म्हणजेच टॅक्सी स्कॉड ची निर्मिती करण्यात आली. सदर टॅक्सी प्रवासी मदत पथकाबाबत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी मुंबई (मध्य ) श्रीमती समरीन सय्यद यांनी वरील चित्रफितीत माहिती दिली आहे. सदर चित्रफित रस्ता सुरक्षा टीम,आरटीओ मुंबई (मध्य) यांनी गिरी मीडिया यांच्या सहकार्याने बनविली आहे. टॅक्सी स्कॉड बाबत ची माहिती जास्तीत जास्त लोकांना मिळावी जेणेकरून अडचणीच्या वेळेस त्यांना मदत होऊ शकेल यासाठी वरील क्लिप आपण सर्वांनी जास्तीत जास्त शेअर करावी