मुंबईत हवालदार वडिलांच्या सर्विस रिव्हॉल्व्हर मधुन गोळ्या घालून मुलाची आत्महत्या कारण अद्याप अस्पष्ट…

संपादक- रणजित मस्के
मुंबई : दिनांक २४/०१/२०२५ आज रोजी ना.म.जोशी मार्ग पोलीस ठाणे हद्दीमध्ये कामगार नगर, म्हाडा कॉलनी, सी विंग, २२ वा मजला येथे वास्तव्यास असलेले पोलीस हवालदार संतोष मस्के, (९७ बॅच) नोकरी SPU तेथे कार्यरत असून सध्या ते प्रफुल्ल पटेल, माझी लष्कर मंत्री त्यांच्याकडे बॉडीगार्ड असून त्यांच्याजवळ रिवाल्वर असे वेपन आहे. तरी त्यांच्या जवळील रिवॉल्वर वेपन च्या साह्याने त्यांचा मुलगा, वय २१ वर्षे याने स्वतःवर गोळ्या झाडून घेतले आहेत. आत्महत्या केल्याचे कारण अद्याप पर्यंत उघडकीस/समजून आले नाही. ना.म.जोशी मार्ग मोबाईल क्रमांक १ सदर ठिकाणी पुढील तपासाकरिता उपस्थित आहेत. मुंबईत गेल्या काही दिवसांपासून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे. त्यातच आता मुंबई पोलीस दलातील एका हवालदारच्या मुलाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हर्ष म्हस्के असे या मुलाचे नाव असून तो 20 वर्षांचा होता. हर्षने वडिलांच्या सर्व्हिस रिवॉल्व्हरमधून गोळ्या झाडून जीवन संपवल्याचे समोर आले आहे. * मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील लोअर परेल परिसरातील एन. एम. जोशी मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत मुंबई पोलीस हवालदाराच्या मुलाने आत्महत्या केल्याचे घटना समोर आली आहे. हर्ष म्हस्के असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याने वडिलांच्या सर्व्हिस रिवॉल्व्हरमधून गोळ्या झाडून आत्महत्या केली आहे.* हर्षचे वडील पोलीस हवालदार संतोष म्हस्के हे SP युनिटमध्ये मुंबई पोलीस दलात हवालदार म्हणून काम करतात. संतोष म्हस्के यांच्या सर्व्हिस रिवॉल्व्हरमधून हर्षने स्वतःच्या डोक्यात गोळ्या झाडून आत्महत्या केली. संतोष म्हस्के हे राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्याकडे काही काळ बंदोबस्तासाठी त्यांच्या युनिटमध्ये तैनात होते, अशी माहिती समोर येत आहे. सध्या मुंबई पोलीस आणि गुन्हे शाखेचे पथक हे त्यांच्या घरी पोहोचले आहे. ते या घटनेची माहिती घेत आहेत. मात्र २० वर्षीय हर्ष म्हस्केने आत्महत्या का केली, हे समजू शकलेले नाही.