मुक्ताईनगर पोलीसांनी काढलेल्या गावगुंडाच्या धिंडीचे होतय सर्वत्र स्वागत…!!

जळगाव : मुक्ताईनगर तालुक्यातील कुरहा काकोडा गावात खून, मारामाऱ्या, चोरी, दरोड्यांसह स्थानिक जनतेत दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारांविरोधात 3 दिवसांपूर्वीच मुक्ताईनगर पोलिसांनी चांगलीच कडकं भूमिका घेतली आहे. दोन सराईत गुन्हेगारांची गावभर धिंड काढून जनतेच्या मनातील भीती कायम कमी करण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला आहे.

पवार गॅगने सामान्य नागरिकांनाही धमकावत दहशत निर्माण केली होती. त्यांच्या दहशतीमुळे संपूर्ण गाव भीतीच्या छायेत होतं. या गुंडांच्या कारनाम्यांची मुक्ताई नगर पोलिसांनी गंभीर दखल घेत कठोर कारवाईचा निर्णय घेतला.
मुक्ताई नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक श्री. राहुल खताळ यांनी या दहशत माजवणाऱ्या गुंडांना अटक केली. इतकंच नाही तर गावकऱ्यांच्या मनातील भीती कायमची घालवण्यासाठी त्यांची गावभर धिंडही काढली.
मुक्ताईनगर पोलिसांनी केलेल्या या कारवाईचा व्हिडिओ सोशल मीडिया मध्ये वायरल झाल्यापासून नागरिकांनी पोलिसांच्या कारवाईचे स्वागत केलं आहे.
गुन्हेगारांना कायद्याचा धाक निर्माण व्हावा आणि सर्व सामान्य जनतेला निर्भयपणे गावभर वावरता यावं याच उदेशाने ही कारवाई केली गेली असल्याचं मुक्ताईनगर पोलिसांचे म्हणन आहे .
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
dipakbhogal@surakshapolicetimes.com