पोलीस भरती मैदानी चाचणीत १६०० मिटर रनिंग करताना कोसळणाऱ्या विद्यार्थ्याचा वाचवला जीव – स.पो.आ.सुजाता पाटील मैडम

उपसंपादक-रणजित मस्के
मुंबई: शुक्रवार दिनांक २४ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी ०५ : ३० वाजता पोलीस भरती मैदानी चाचणी करता उतरलेला विद्यार्थी राहुल शिंदे १६०० मिटर रनिंग करताना अचानकपणे कोसळणार इतक्यात त्याला तत्परतेने पकडून योग्य नैसर्गिक प्रथमोपचार हाताने एक्सरसाइज करून त्याची बॉडी नॉर्मल करण्यात आली.

धास्तावलेल्या सहा.पोलीस आयुक्त यांच्या मनाला काही समजत नव्हते. काहीतरी विपरीत होणार याची भीती अनाहुत होती. काहीही करून तो परीक्षार्थी राहुल शिंदे नॉर्मल व्हावा हा एकच ध्यास त्यांच्या मनाला लागला होता.
पोलीस करियर बरोबर आपला जीव सुद्धा फार महत्वाचा असतो याची त्या विद्यार्थ्याला राहुल शिंदेला त्यांनी जाणीव करून दिली.त्यानंतर त्याला योग्य प्रकारे समजावून सांगून पुढच्या पोलीस भरतीच्या वेळेला उतरण्याबाबत योग्य मार्गदर्शनही करण्यात आले.
या अशा परिस्थितीत परमेश्वराने स.पोलीस आयुक्त सुजाता पाटील मैडम यांना विद्यार्थी राहुल शिंदे याचा जीव वाचवण्याची सुवर्णसंधी दिल्याचे सांगितले.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com