हरवलेले मोबाईल परत मिळवून दिल्याबद्दल पुण्यातील पोलीस उपायुक्त परिमंडळ २ च्या श्रीमती स्मार्तना पाटील यांच्यावर होतोय कौतुकांचा वर्षाव..

उपसंपादक-रणजित मस्के
पुणे :-मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर व मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली मा. श्रीमती स्मार्तना पाटील, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ -२, पुणे शहर यांचे कल्पनेतून परिमंडळ -२ मधील सर्व पोलीस स्टेशन अंतर्गत प्रॉपर्टी मिसिंग केसेस विशेषतः मोबाईल फोन बाबत विशेष मोहिम राबवून पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांचे पथक तयार करण्यात आले आहे.

परिमंडळ -२ पुणे शहर विभागातील सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना पोलीस उप आयुक्त, परिमंडळ -२, पुणे शहर यांनी हरविलेल्या मोबाईल फोन मिळविण्यासाठी "एक महिण्याच्या विशेष मोहिम' राबविण्यात येवून त्यासाठी पोलीस स्टेशन स्तरावर वपोनि यांचे अधिपत्याखाली तपास पथक अधिकारी व प्रत्येकी ०२ अंमलदार असे पथक तयार करण्यात आले. विशेष पथकाद्वारे जे मोबाईल फोन मिळून येत नाहीत, अशा मोबाईल फोनच्या आय. एम. ई. आय. क्रमांकाचे अनुषंगाने संबधीत मोबाईल कंपनी यांस पत्रव्यवहार करून, तांत्रीक विश्लेषणाद्वारे माहे नोंव्हेंबर २०२३ मध्ये खालील प्रमाणे मोबाईल फोन मिळविण्यात यश आलेले आहे.
मिळविण्यात आलेले सर्व मोबाईल फोन हे फिर्यादी यांना परत करण्यासाठी प्रॉपर्टी मिसिंग मोबाईल मुद्देमाल हस्तांतरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून ब-याचशा फिर्यादी यांचा संपर्क होवू न शकल्याने त्यांचेशी संपर्क करून नागरीकांचे मोबाईल फोन नागरीकांना मिळवून देण्याची तजवीज ठेवली आहे.
प्रॉपर्टी मिसिंग केसेस विशेष मोहिम राबविण्याचे आयोजन मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर, व मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली मा. श्रीमती स्मार्तना पाटील, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ -२, पुणे शहर यांचे कल्पनेतून परिमंडळ हद्दीतील सपोआ लष्कर व सपोआ स्वारगेट विभाग व सर्व पोलीस स्टेशनचे वपोनि यांचे अधिपत्याखाली तपास पथक अधिकारी व अंमलदार यांनी सदर कामगिरी बजावली आहे.


ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com