बोरीवलीत निशुल्क शासन स्पर्धा परीक्षेचे विशेष मार्गदर्शनाचे आयोजन- मार्गदर्शक – श्री. सत्यवान रेडकर

संपादिका – दिप्ती भोगल
बोरीवली ;
शनिवार, दिनांक ४ जानेवारी २०२५ रोजी सकाळी १०.०० वाजता बीमा नगर एज्युकेशन सोसायटी माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, डॉ. वासुदेव शृंगी मार्ग, एल.आय.सी कॉलनी, शांती आश्रम डेपोजवळ, बोरिवली पश्चिम येथे ३०७वे निःशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व्याख्यान*
जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी/पालकांनी/नागरिकांनी या निःशुल्क मार्गदर्शन व्याख्यानाचा लाभ घ्यावा व आपल्या संपर्कातील व्यक्तींना व्हाट्सअप समुहांना पोस्टरचे प्रसारण करावे.
👉 माझे हे ३०७वे निःशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आहे. मी कोणतेही मानधन घेत नाही, विद्यार्थ्यांना समुपदेशन व मार्गदर्शन नेहमीच निःशुल्क.
👉 राज्य शासनासाठी मागास प्रवर्गातील व्यक्तींसाठी कमाल मर्यादा 43, खुल्या प्रवर्गातील व्यक्तींसाठी कमाल वयोमर्यादा 38 त्यामुळे सदर मार्गदर्शन हे सर्व जाती-धर्मातील व्यक्तींसाठी असते. कोणतेही रजिस्ट्रेशन शुल्क नसते.
आपल्या महाराष्ट्रातील व्यक्तींना रोजगाराच्या अनुषंगाने संधीचा लाभ घेता यावा व जास्तीत जास्त महाराष्ट्रातील व्यक्तींचे विविध पदांवर निवड होण्यासाठी वरील पोस्टरच्या अनुषंगाने जास्तीत जास्त संख्येत उपस्थित रहावे, आपल्या नातेवाईकांना किंवा आप्तेष्टांना स्वतःहून घेऊन यावे अथवा त्यांना उपस्थित राहण्यास प्रवृत्त करावे. जास्तीत जास्त व्हाट्सअप समूहांना प्रसारित करण्यासाठी प्रयत्न करावे.
मी डोंबिवली वरून निःशुल्क मार्गदर्शन करण्यासाठी जाऊ शकतो तर आपण स्वतःच्या/इतरांच्या भविष्यासाठी वेळ काढून का येऊ शकत नाही? ट्रेन नव्हती, सुट्टी नव्हती, वेळ नव्हता, घरी पाहुणे आले होते, खाजगी क्लास होता, फार लांब आहे, घरचा कार्यक्रम होता ही आपली वैयक्तिक कारणे आहेत. माझ्या घरी किंवा माझ्या कार्यालयात वैयक्तिक भेटून, फोनवर किंवा किंवा रेडिमेड व्हिडियो लिंक द्वारे मार्गदर्शन प्राप्त करण्याची वाट पाहू नये. भविष्याविषयी चिंता असेल तर पालक आणि विद्यार्थी वेळ काढून उपस्थित राहतील.
आपलाच,
सत्यवान यशवंत रेडकर
मो. 9969657820
अनुवाद अधिकारी, मुंबई सीमाशुल्क, भारत सरकार
SSC JHT EXAM, AIR 166
संस्थापक, तिमिरातुनी तेजाकडे