महाराष्ट्र पोलीस बाॅईज संघटनेचे अध्यक्ष श्री. राहुल दूबाले यांनी घेतली महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विशेष भेट…

उपसंपादक-रणजित मस्के
मुंबई: महाराष्ट्र पोलीस बाॅईज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राहुल दूबाले यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री मा.श्री. देवेंद्र फडणवीस साहेब यांची मुंबई येथे सह्याद्री अतिथी गृहावर मंत्रिमंडळ बैठकीदरम्यान भेट घेतली.
भेटीमध्ये पोलिसांचे प्रलंबित असणारे गृह अग्रीम लोन मंजूर झाला असून आणखीन वितरण नाही हे सांगितले तर तात्काळ देवेंद्र फडणवीस साहेबानी अधिकाऱ्यांना आदेशीत केले की लोन लवकरात लवकर वाटप करावे.
पोलीस परिवार महामंडळ स्थापन करण्यासाठी महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेला राज्यातील मंत्र्यांनी व आमदारांनी पत्र दिले आहे.७० च्या वर शिफारस पत्र दिलेले आहेत. त्यावेळेस देवेंद्र फडणवीस साहेब म्हणाले लवकरच पोलीस परिवार महामंडळ स्थापन करू.

जुलै महिन्यात विदर्भातील पोलीस परिवारांच्या व होमगार्ड आणि जेल पोलीस अस्तित्वासाठी विदर्भ अस्तित्व मेळावा हा माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होणार आहे.
याची सर्व विदर्भातील पोलीस परिवाराने नोंद घेऊन मेळाव्याला उपस्थित राहायचे आहे असे सांगण्यात आले.
मेळाव्यातील प्रमुख प्रश्न
1) पोलीस परिवारासाठी शिक्षण, संरक्षण ,आरोग्य, निवारा व रोजगार
2) होमगार्ड यांच्यासाठी वर्षाचे 365 दिवस काम व मोफत आरोग्य चा लाभ.
3) जेल पोलिसांना महाराष्ट्र पोलीस यांच्यासारख्या सर्व सोयी सुविधा मिळाव्यात .
चला तर थेट मांडू गृहमंत्री यांच्या समोर
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com