दवनीवाडा पोलीसांनी धान चोरी करणाऱ्या 4 चोरट्यांना जेरबंद करून चोरीचे धान केले हस्तगत…

उपसंपादक-रणजित मस्के
गोंदिया :-➖➖ याबाबत थोडक्यात हकीगत अशी की, पोलीस स्टेशन दवनीवाडा हददीतील मौजा परसवाडा येथील फिर्यादी नामे – राकेश अंबादास वैद्य रा. परसवाडा यांनी त्यांचे शेतातील धान गोडावुन मधुन 300 पोते धान प्रती क्विंटल 2300/-रु. प्रमाणे एकुण किंमती 6, लक्ष 21 हजार/-रुपयांचे आरोपीतांनी सुना मौका पाहुन वेळो-वेळी चोरी करुन नेले आहे…. अशा फिर्यादीच्या तक्रारी वरुन अज्ञात आरोपी विरुध्द पो.ठाणे दवनिवाडा येथे अप. क्रमांक 167/2024 कलम 461, 380, 34 भा.दं.वि. अन्वये दिनांक- 03/07/2024 रोजी गुन्हा नोंद करुन मा. वरिष्ठांचे निर्देश सूचना मार्गदर्शनात सदर गुन्ह्याचा तपास करण्यात आला… सदर गुन्हयातील आरोपींचा शोध घेवुन आरोपी नामे–
1) सुमीत देवानंद उईके, वय 19 वर्ष
2) नितेश मनोहर फुन्ने, वय 24 वर्ष
3) कैलाश शंकर कोहळे वय 22 वर्ष तिन्ही रा. परसवाडा ता. तिरोडा जि. गोंदिया
यांना दिनांक – 04/08/2024 रोजी गुन्हयात अटक करण्यात आली.. आरोपींचा पोलीस कोठडी रिमांड घेवुन गुन्ह्याचे अनुषंगाने सविस्तर विचारपुस चौकशी केली असता आरोपीतांनी आणखी दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांसह परसवाडा येथील फिर्यादी चे धान गोडावुन मधुन धान चोरी करुन आरोपी नामे –
4) संजेश जगदीश वाघाडे वय 38 वर्ष, रा. बेरडीपार ता.तिरोडा जि. गोंदिया
याला धान विक्री केल्याचे कबुल केले. चोरीस गेलेले धान नमूद आरोपीतांकडुन गुन्ह्यात हस्तगत करण्यात आले… असुन गुन्हा उघडकीस आणलेला आहे… गुन्ह्यातील अरोपीतांना एम. सी. आर. भंडारा जेल रवाना करण्यात आले आहे.
सदर गुन्हयाचा तपास मा. पोलीस अधिक्षक श्री. निखील पिंगळे, अपर पोलीस अधिक्षक श्री. नित्यानंद झा, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. साहील झरकर, यांचे निर्देशाप्रमाणे पोलीस स्टेशन दवनीवाडा चे पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम अहेरकर यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि. संजयकुमार टेकाम,पोहवा. मिलकीराम पटले, धनेश्वर पिपरेवार, राजेश पारधी, पो.ना. मोहन टेंभेकर, पो.शि. सेअंत जांभुळकर, स्वप्निल भलावी, उमेश नान्हे, गणेश ठाकरे, यांनी अथक परिश्रम करुन गुन्हा उघडकीस आणला.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com