अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांची कोणतीही चौकशी न करता प्रशस्तीपत्र देऊन सन्मान – श्री अतुल कुलकर्णी (पो.अधीक्षक उस्मानाबाद)

प्रतिनिधी-रणजित मस्के
उस्मानाबाद: अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांचा सन्मानच करणार असे आव्हान उस्मानाबाद पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी यानी विभागातील नागरिकांना केले आहे.
अपघातात मृत्यु होणाऱ्या अनेक व्यक्तींना वेळेवर वैद्यकीय उपचार मिळाल्यास त्यांचा जीव वाचू शकतो त्याचबरोबर अपघाती मृत्यू पावणाऱ्या व्यक्तींच्या संख्येत पण घट होईल, त्यामुळे अपघात स्थळावरील नागरिकांनी अपघातग्रस्तांना मदत करावी असे आव्हान करण्यात आले आहेत.
पोलीस विभागाकडून मदत करणाऱ्यांची कोणतीही चौकशी केली जाणार नाही, असे आवाहन पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी केले आहे.
विशेष म्हणजे रस्ते अपघातातील जखमींना मदत केल्यानंतर पोलीस विभागाकडून मदत करणाऱ्यांची चौकशी न करता त्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येईल.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com