मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी परभणी यांचे कडुन राज्य उत्पादन शुल्क विभागा मार्फत दाखल एमपीडीए प्रस्ताव मंजुर..

उपसंपादक-रणजित मस्के
परभणी :– सन्माननीय महोदय श्री. डॉ. विजयकुमार सुर्यवंशी साहेब (भा. प्र. से), आयुक्त राज्य उत्पादन शुल्क मरा. मुंबई, सन्माननीय महोदय श्री. प्रसाद सुर्वे साहेब संचालक (अ. व. द.) राज्य उत्पादन शुल्क मरा. मुंबई, यांच्या आदेशाने तसेच मा. विभागीय उप-आयुक्त राज्य उत्पादन शुल्क नांदेड श्री. बि. एच. तडवी साहेब यांनी दिलेल्या निर्देशा प्रमाणे, तसेच मा. अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क परभणी श्री. गणेश पाटील यांच्या मार्गदर्शनात, निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, परभणी श्री. सु. अ. चव्हाण यांनी “महाराष्ट्र झोपडपट्टीगुंड, हातभट्टीवाले, औषधीद्रव्य विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती दृकश्राव्य कलाकृतींचे विनापरवाना प्रदर्शन करणाऱ्या व्यक्ती ( व्हिडीओ पायरेट्स) वाळु तस्कर व अत्यावश्यक वस्तुंचा काळा बाजार करणाऱ्या व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबत अधिनियम १९८१” कायदया नुसार सादर केलेला प्रस्ताव मा. जिल्हाधीकारी तथा जिल्हादंडाधिकारी परभणी श्री. रघुनाथ गावडे यांच्या कडुन मंजुर,
सराईत आरोपी हातभट्टीवाला अर्जुन रतन गायकवाड, रा. कानसुर वस्ती, ता. पाथरी, जि. परभणी हा बेकायदेशीररीत्या हातभट्टी दारु निर्मीती करुन कानसुर सह, पाथरी शहर परिसरातील गावात सर्व सामान्य नागरिकांना बेकायदेशीर पणे हातभट्टी दारू विक्री/ पोच करत असे.
सदर इसम आपल्या राहत्या घरी, कानसुर वस्ती, ता. पाथरी, जि. परभणी येथे बेकायदेशीरित्या हातभट्टी दारुचे, रसायन सडावयास ठेऊन, भट्टी लावुन, हात भट्टी तयार करत असे, सदरची हातभट्टी ही मानवी आरोग्यास घातक व मानवी जिवीतास अपायकारक आहे याची कल्पना असतांना सुध्दा बनावट हातभट्टी दास तयार करून सर्रासपणे कानसुर, पाथरी शहर व नजिकच्या गावात विक्री/ पोच करीत असे, सदर हातभट्टीवाला इसम अर्जुन रतन गायकवाड सराईतपणे बेकायदेशीर कृत्य करीत असुन, याच्या या बेकायदेशीर व गुन्हेगारी कारवाया रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने त्याचे विरुध्द वेळो वेळी गुन्हे दाखल केलेले आहेत.
अशाच प्रकारचे गुन्हे करण्याच्या सवयीचा असुन त्याच्या या मानवी जीवितास धोकादायक असलेल्या हातभट्टी दारु निर्मीती, विक्री व्यवसाय रोखण्यासाठी त्याचे विरुध्द महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम (१९४९) चे कलम ९३ प्रमाणे प्रतिबंधात्मक कारवाई करुन, मा. उप विभागीय दंडाधिकारी पाथरी, कार्यालय पाथरी यांनी चांगल्या वर्तणुकी बाबत व असे गुन्हे परत न करण्यासाठी रु. १,००,०००/- (अक्षरी एक लाख रुपये) चे बंधपत्र घेतले आहे, तरी देखील प्रतिबंधात्मक कारवाईस न जुमानता पुन्हा गुन्हे केले आहेत, या करीता सदरचे बंधपत्र रद्द करण्याचा प्रस्ताव देखील दाखल केला असता हातभट्टीवाले अर्जुन रतन गायकवाड यावर काहीही परीणाम न होता त्याने पुन्हा चढत्या क्रमाने गुन्हे केलेले आहेत. करीता त्याचे विरुध्द “महाराष्ट्र झोपडपट्टी गुंड, हातभट्टीवाले, औषधीद्रव्य विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती दृकश्राव्य कलाकृतींचे विनापरवाना प्रदर्शन करणाऱ्या व्यक्ती (व्हिडीओ पायरेट्स) वाळु तस्कर व अत्यावश्यक वस्तुंचा काळा बाजार करणाऱ्या व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबत अधिनियम १९८१” अन्वये निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, परभणी श्री. सु.अ. चव्हाण यांनी अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, परभणी श्री. गणेश पाटील यांच्या मार्फत मा. जिल्हाधीकारी तथा जिल्हादंडाधिकारी परभणी श्री. रघुनाथ गावडे साहेब यांना
प्रस्ताव सादर केला असता मा. जिल्हाधीकारी तथा जिल्हादंडाधिकारी परभणी यांनी हातभट्टीवाला इसम अर्जुन रतन गायकावाड यास स्थानबध्द करण्याचे आदेश दिलेत, करीता हातभट्टीवला इसम अर्जुन रतन गायकावाड यास जिल्हा मध्यवर्ती कारागृह छत्रपती संभाजीनगर येथे स्थानबध्द करण्यात आले आहे.
तरी याद्वारे अवाहन करण्यात येते की, कोणीही अवैध मद्य खरेदी करु नये, तसेच परभणी जिल्हयात अवैद्य मद्य, बनावट व परराज्यातील विदेशी मद्य कोणी बाळगुन असेल किंवा विक्री करीत असेल तर याची खबर या विभागास देण्यात यावी. या विभागाचा टोल फ्री क्र. १८००२३३९९९९ व व्हॉटस अप क्र.८४२२००११३३ वर संपर्क साधावा.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com