मौज मजेसाठी दुचाकी चोरी करणारे तरुणांकडुन दहा मोटार सायकल विमानतळ पोलीसानी केल्या जप्त

0
Spread the love

सह संपादक – रणजित मस्के

पुणे

विमानतळ पोलीस ठाणेचे तपास पथकातील अंमलदार दादासाहेब बर्डे व ज्ञानदेव आवारी यांना त्यांचे गोपनिय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, दुचाकी मोटार सायकल चो-या करणारे दोन इसम चोरीचे बुलेट मोटार सायकलसह संजयपार्क मध्ये आहेत. सदरची बातमी तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक विजय चंदन यांना कळविली असता,

त्याप्रमाणे स्टाफचे मदतीने विमानतळ तपास पथकाने सापळा रचुन चोरीची बुलेट मोटार सायकल व त्यावरील दोन इसम नामे १) मनिषसिंग जितेंद्रसिंग भदोरिया वय २१ वर्ष रा. लेन नंबर ०५. महादेवनगर, अवधुत बंगल्याचे बाजुला संतनगर, लोहगाव पुणे २) कार्तिक अनिल फुलपगार वय २१ वर्ष रा. गुरुद्वारा कॉलनी, स्मशानभुमी जवळ लोहगाव पुणे यास ताब्यात घेतले त्याचेकडे गुन्हयाचे अनुषंगाने अधिक तपास करता एकुण दहा चोरीच्या मोटार सायकल मिळुन आल्या आहेत. त्यापैकी विमानतळ पोलीस स्टेशनचे हद्दीतील सात दुचाकी चोरीचे गुन्हे, कोथरुड पोलीस स्टेशनचे हद्दीतील एक दुचाकी चोरीचा गुन्हा उघड करण्यात आलेला आहे. तसेच उर्वरीत दोन मोटारसायकल बाबत तपास सुरु आहे. नमुद आरोपी यांचेकडुन एकुण ७,००,०००/-रु (सात लाख रुपये) किं. च्या दहा दुचाकी मोटार सायकल हस्तगत करण्यात आल्या आहेत.

सदरची कारवाई ही मा. अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर, श्री. मनोज पाटील मा. पोलीस उपायुक्त परि-०४ श्री. हिम्मत जाधव, मा. सहा. पोलीस आयुक्त, येरवडा विभाग श्रीमती प्रांजली सोनवणे यांचे मार्गदर्शनाखाली विमानतळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक, गुन्हे श्रीमती आशालता खापरे सहा. पोलीस निरीक्षक विजय चंदन, पोलीस अंमलदार रुपेश पिसाळ, शैलेश नाईक, राकेश चांदेकर, अंकुश जोगदंडे, योगेश थोपटे, दादासाहेब बर्डे, ज्ञानदेव आवारी, हरीप्रसाद पुंडे, लालु कहे, गिरीष नाणेकर, रुपेश तोडेकर यांचे पथकाने केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट