सातारा जिल्हयातील मोटार सायकल चोरी करणारी टोळी सातारा पोलीसांनी केली तडीपार
उपसंपादक – रणजित मस्के
सातारा सातारा जिल्हयामध्ये मोटार सायकल चोरी करणारे सराईत गुन्हेगार टोळी प्रमुख प्रल्हाद शिवाजी पवार, वय २३ वर्षे, रा.गोपाळवस्ती अजंठा चौक, सातारा ता. जि. सातारा २. शिवाजी मल्हारी बूटे, वय ३८ वर्षे, रा. अजंठा चौक, सातारा ता.जि. सातारा (टोळी सदस्य) यांचेवर सातारा जिल्हयामध्ये जबरी चोरी, मोटार सायकल चोरी, चोरीची मालमता बाळगणे असे गुन्हे दाखल असल्याने सातारा शहर पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक भगवान निबाळकर यांनी सदर टोळीविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ प्रमाणे सातारा जिल्हयातून तडीपार करणेबाबतचा प्रस्ताव हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा यांचेकडे सादर केलेला होता.

सदर प्रस्तावामध्ये यातील टोळीविरुद्ध दाखल असले गुन्हयांमध्ये त्यांना अटक करुनही ते जामीनावर बाहेर आल्यानंतर त्यांचेवर वेळोवेळी करण्यात आलेल्या प्रतिबंधक कारवाईचा कोणताही परिणाम झाला नाही अगर त्यांचे गुन्हेगारी कृत्यांमध्ये सुधारणा झाली नाही. ते सातारा जिल्हयातील सर्वसामन्य लोकांच्या मोटार सायकल चोरी करून इतर गुन्हे करीत होते त्यांचेवर कायदयाचा कोणताच धाक न राहील्याने अशा गुन्हेगारांवर सर्वसामन्य जनतेमधुन कडक कारवाई करणेची मागणी होत होती..

हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा यांनी टोली प्रमुख व टोळी सदस्य यांचेवर दाखल असले गुन्हयांची माहीती घेवून मोटार सायकल चोरी तसेच इतर गुन्हे करणारे २. प्रल्हाद शिवाजी पवार, वय २३ वर्षे, रा. गोपाळवस्ती अजंठा चौक, सातारा ता. जि. सातारा २. शिवाजी मल्हारी बुटे, वय २८ वर्षे, रा. अजंठा चौक, सातारा ता. जि. सातारा या टोळीस मा. समीर शेख, हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ अन्वये सातारा जिल्हयातुन दोन वर्षाकरीता हद्दपारीचा आदेश पारीत केला आहे.
नोव्हेंबर २०२२ पासून ५ उपद्रवी टोळयांमधील १३ इसमांना तडीपार करण्यात आले आहे.. भविष्यातही सातारा जिल्हयामधील सराईत गुन्हेगारांचेविरुध्द हद्दपारी मोक्का, एमपीडीए अशा प्रकारच्या कडक कारवाया करणेत येणार आहेत.
या कामी हद्दपार प्राधिकरणापुढे सरकार पक्षाच्या वतीने अपर पोलीस अधीक्षक, सातारा श्री बापू बांगर, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे श्री अरुण देवकर, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, सातारा, पोलीस उपनिरीक्षक मधुकर गुरव, पोना प्रमोद सावंत, पो. का. केतन शिंदे, म.पो.कॉ. अनुराधा सणस यांनी योग्य पुरावा सादर केला आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com