मोटारसायकल चोरी करणाऱ्या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखा, पालघर यांचेकडून अटक..!

उपसंपादक : मंगेश उईके
पालघर.:-
दिनांक १५/०७/२०२४ रोजी पालघर पुर्व येथील रेल्वे स्टेशन जवळ पाकींग करुन ठेवलेली मोटार सायकल क्रमांक एमएच-४८-सीई-५८१९ हि कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेलेबाबत फिर्यादी रतिष अमोल भोपी वय १८ वर्षे रा. मानवत कोळीपाडा, ता. जि. पालघर यांनी दिलेल्या तक्रारीवरुन पालघर पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं. १४९/२०२४ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३ (२) प्रमाणे तसेच दिनांक २०/११/२०२४ रोजी पालघर पुर्व रेल्वे स्टेशन जवळ पार्कीग करुन ठेवलेली मोटार सायकल क्रमांक एमएच-४८- सीएफ-५०२२ हि कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेलेबाबत फिर्यादी मिलन अजित पंजाबी वय २९ वर्षे रा. सुंदरम नाका, गिरनार रेसिडेन्सी, पालघर ता. जि. पालघर यांनी दिलेल्या तक्रारीवरुन पालघर पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं. २५४/२०२४ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३ (२) प्रमाणे असे दोन वेगवेगळे गुन्हे पालघर पोलीस ठाणे येथे दाखल आहेत.
घरील प्रमाणे दोन्ही गुन्हयामधील चोरीस गेले वाहनांचा व अज्ञात आरोपीत याचा शोध घेवुन गुन्हा उघडकीस आणणेकरीता बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर, विनायक नरळे, अपर पोलीस अधीक्षक, पालघर व अभिजीत धाराशिवकर, उप विभागीय पोलीस अधिकारी, पालघर उप विभाग यांनी केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे यातील आरोपीत याचा पोलीस निरीक्षक प्रदिप पाटील स्थानिक गुन्हे शाखा, पालघर यांचे पथकाने गुन्हयाचा समांतर तपास करीत तांत्रीक पध्दतीने तसेच गोपणीय माहितीच्या आधारे शोध घेतला असता इसम नामे बिजय क्रिष्णा गोष वय ४३ वर्षे व्यवसाय मजुरी सध्या रा. फ्लॅट नं. बी/३०४, ओम वास्तु, ३ रा माळा, डोंगरपाडा, विरार (प) ता. वसई जि. पालघर, मुळ रा. ग्राम एम-११० वासंती कॉलनी, राऊर केला, उडीसा याने सदरचे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले असुन त्यास विरार परीसरातुन ताब्यात घेवुन वरील दोन गुन्हे उघडकीस आणले आहेत.
सदरची कामगिरी बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर, विनायक नरळे, अपर पोलीस अधीक्षक, पालघर व अभिजीत धाराशिवकर, उप विभागीय पोलीस अधिकारी, पालघर उप विभाग यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक, प्रदीप पाटील, प्रभारी अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखा, पालघर, पोउनि / रविंद्र तानखेडे, पोहता. / ९३६ संदीप सरदार, पोहता. / ८६६ दिनेश गायकवाड, व पोहवा./२२६ राकेश पाटील, सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा, पालघर, यांनी केली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोहवा./९२१ भगवान आव्हाड, नेमणूक पालघर पोलीस ठाणे हे करीत आहेत.


ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com