मोटरसायकल चोरी करणाऱ्या चोरट्याला कोळसेवाडी पोलीसांनी ठोकल्या बेड्या..

0
Spread the love

प्रतिनिधी विश्वनाथ शेनोय
दि ३० कल्याण ठाणे


कोळसेवाडी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नं. ३६७/२०२५ भा.न्या.स. २०२३ चे कायदा कलम ३०३ (२) प्रमाणे अॅक्टीवा स्कुटर दि १२ रोजी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आले. या गुन्हेचा तपास वरीष्ठ पोलीस निरीक्षक गणेश न्हायदे यांचे मार्गदर्शनाखाली दि २९ रोजी गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना मिळालेल्या गोपनीय बातमी वरून आंबीवली, कल्याण येथुन गुन्हयातील आरोपीत नाव करण अण्णासाहेब गायकवाड, वय २२ वर्षे, राह. आरएस टेकडी, धम्मदिपनगर, मोहने, ता. कल्याण, जि. ठाणे. मुळगाव करजगाव, सोनई, ता. नेवासे, जि. अहिल्यानगर. यास गुन्हयात चोरीस गेलेल्या ४० हजार रू किमतीची लाल रंगाची स्कुटी MH-05-ET – 9349 सह ताब्यात घेतले असून त्याने सदर गुन्हा केल्याची कबुली देवुन त्यास विश्वासात घेवुन अधिक विचारपुस करता त्याने विष्णूनगर पोलीस स्टेशन, डोंबीवली पश्चिम हददीतुन दोन मोटार सायकल चोरी केल्याची कबुली दिली असुन अधिक तपास सुरू आहे.सदरची कामगिरी मा. पोलीस उप आयुक्त सोो, परी. ३ कल्याण श्री. अतुल झेंडे, व सहा. पोलीस आयुक्त सोो, कल्याण विभाग, श्री. कल्याणजी घेटे, कोळसेवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. गणेश न्हायदे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सपोनि/दर्शन पाटील, पोहवा/६२५६ राजेश कापडी, पो.हवा.३११२ भागवत सौंदाणे, पोहवा /१५३२ मिंलीद बोरसे, पोहवा/१२२६ शांताराम सांगळे, पोहवा/६५४८ भगवान सांगळे, पोशि/२६५६ दिलीप सोनावळे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट