मोटरसायकल चोरी करणाऱ्या अल्पवयीन मुलाकडुन चोरीच्या २ मो.सा. जप्त राजारामपुरी पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाची कारवाई

कोल्हापूर

सह संपादक -रणजित मस्के
पोलीस ठाणे
गु.र.नं. कलम
फिर्यादी
राजारामपुरी
१) गु.र.नं. २९१/२०२५ BNS कलम ३०३ (२) प्रमाणे
सुरेश पंडीत येडाळे, वय ४५, रा. राजारामपुरी ४ थी गल्ली मातंग वसाहत, कोल्हापूर
गुन्हा घडला तारीख, वेळ व ठिकाण
जप्त मुद्देमाल
माहिती कशी प्राप्त झाली
दि. ०६.०५.२०२५ रोजी रात्री ११.१५ वा. ते ११.४५ वा. चे दरम्यान मुदतीत पिंपळेश्वर मंदिर, राजारामपुरी येथुन
१) १५,०००/- रुपये त्यामध्ये हिरो होंडा स्लेंडर
नं. MH-09-BJ-3227
२) ६०,०००/- रुपये त्यामध्ये हिरो होंडा एलेंडर प्लस नं. MH-11-DQ-7814 असा एकुण- ७५,०००/- रुपये
गोपनिय बातमीदार यांचे मार्फत
थोडक्यात हकीगत –
राजारामपुरी पोलीस ठाणे गु.र.नं. २९१/२०२५ भा.न्या.सं. कलम ३०३ (२) प्रमाणे दाखल गुन्हयातील चोरीस गेले मो. सा. चा व अज्ञात चोरट्याचा समांतर तपास गुन्हे शोध पथकामार्फत करत असता पो.कॉ. १०३३ सावंत यांना त्यांचे गोपनिय बातमीदार मार्फत माहिती मिळाली की, सदर गुन्हयातील चोरीस गेली मो.सा. ही शेखमीरवाडी, ता. खंडाळा, जि. सातारा येथे राहणारा अल्पवयीन मुलाने चोरलेली आहे अशी माहिती मिळाल्याने सदर ठिकाणी जावुन त्यास त्याचे पालकांसमक्ष ताब्यात घेवुन चौकशी करता त्याने स्वतःच्या मोटरसायकल वरुन येवुन दि. ०६.०५.२०२५ रोजी रात्री ११.३० वा. राजारामपुरी येथुन चोरलेची कबुली देवुन मो.सा. लावलेले ठिकाण दाखविले. सदर ठिकाणाहुन अल्पवयीन मुलाने गुन्हयात वापरलेली व चोरलेली मो.सा. जप्त करणेत आलेली असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास पो.ना. २१९५ उमेश कांबळे हे करीत आहे.
आरोपीचे नांव व पत्ता
विधीसंघर्षग्रस्त बालक (अल्पवयीन)
मा. श्री योगेशकुमार गुप्ता, पोलीस अधीक्षक सोो, कोल्हापूर
मा. श्री निकेश खाटमोडे पाटील, अपर पोलीस अधीक्षक सोा, गडहिंग्लज विभाग मा. श्री धिरजकुमार बच्चु, अपर पोलीस अधीक्षक सोो, कोल्हापूर विभाग
मा. श्री अजित टिक्के, उविभागीय पोलीस अधिकारी सोा, शहर विभाग
यांचे मार्गदर्शनाखाली
कारवाई करणारे अधिकारी व अंमलदार
श्री सुशांत चव्हाण, पोलीस निरीक्षक
श्री दत्तात्रय भोजणे, पोलीस उपनिरीक्षक
सफौ. समिर शेख, संदिप सावंत, अमोल पाटील, विशाल शिरगांवकर,
नितीश बागडी, सत्यजीत सावंत, सुशांत तळप
अजय सावंत, सचिन बेंडखळे (सायबर पोलीस ठाणे)