मोटार सायकल चोरून नेलेल्या आरोपीताच्या LCB पथकाने आवळल्या मुसक्या.

0
Spread the love

उपसंपादक – रणजित मस्के

जळगाव:-श्री. किसन नजनपाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांना गुप्त बातमी मिळाली की, साई अँटो बजाज शो रुम चाळीसगाव रोड भडगाव येथील एक कामगार हा शो रुम मधून मो.सा. काढून कमी पैश्यात देत असल्याचे माहिती मिळाल्याने,

मा. एम. राज कुमार, पोलीस अधीक्षक सो. जळगाव, मा. श्री रमेश चोपडे, अपर पोलीस अधीक्षक, चाळीसगांव, मा. श्री अभयसिंग देशमुख, सहाय्यक पोलीस अधीक्षक, चाळीसगाव यांचे आदेशान्वये श्री. किसन नजनपाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांनी पोलीस उप निरीक्षक, गणेश वाघमारे, पोह विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, महेश महाजन, अकरम शेख, लक्ष्मण पाटील, संदिप सावळे, जयंत चौधरी, विजय पाटील, राहुल पाटील, प्रमोद लाडवंजारी, किरण धनगर, नंदलाल पाटील, ईश्वर पाटील, प्रमोद ठाकुर, मोतीलाल चौधरी, अनिल जाधव, नितीन बावीस्कर, श्रीकृष्ण देशमुख, हेमंत पाटील, राहुल बैसाणे, महेश पाटील, अश्यांचे पथक तयार करण्यात आले होते.

वर नमुद पथक हे भडगाव येथे जावून साई अँटो बजाज शो रूम चे मालक यांना त्यांचे कडील स्टॉक बाबत विचारपुस केली असता त्यांनी त्यांचे स्टॉक मधुन १४ पल्सर मोटार सायकल व १६ प्लॅटीना मोटार सायकल असे एकुण ३० मोटार सायकल २२,७७,९८०/- रु. किंमतीच्या कमी असल्या बाबत कळविले त्यावर वरील पथकाने शो रुम मधील स्टाफ यांची विचारपुस करून संशयीत शोएब खान रऊफ खान, रा. नगरदेवळा ता.पाचोरा यास विश्वासात घेवून विचारपुस केली असता त्याने सदर शो रुम मधून साधारण तीन महिन्या पासून वेळोवेळी जशी संधी मिळेल असे १-१ मोटार सायकल बाहेर काढून इतरांना कमी पैश्यात विकत होता. तरी त्यास अजुन विश्वासात घेवून त्याने ज्या व्यक्तींना विकलेल्या आहेत अश्या व्यक्तींना निष्पन्न करीत आहोत. त्यांचे कडून ११ पल्सर मोटार सायकल व १५ प्लॅटीना मोटार सायकल असे एकुण २६ मोटार सायकल १९,५८,१३९/- रु. किंमतीच्या मोटार सायकल ताब्यात घेण्यात आल्या आहेत. तसेच सदर गुन्ह्याचा पुढील तपासकामी भडगाव पोलीस स्टेशन गुरनं १७१ /२०२३ भादवि कलम ३८० या गुन्ह्यात आरोपी व मो.सा. हे पुढील तपास कामी देण्यात आले आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट