मोटारसायकल चोरी करणा-या टोळीला खोपोली पोलिसांनी केले २४ तासात जेरबंद…

प्रतिनिधी-रणजित मस्के

खालापूर: खोपोली शहरात गेल्या काही दिवसात मोटार सायकल चोरीचे प्रकार वाढल्याने पोलीस अधीक्षक, रायगड मा. श्री. सोमनाथ घार्गे सो, अपर पोलीस अधीक्षक, रायगड मा. श्री. अतुल झेंडे सो यांनी गुन्हे उघकिस आणणेबाबत सुचना देवुन आदेशीत केले होते.
उपविभागीय पोलीस अधिकारी खालापुर मा. श्री. संजय शुक्ला सो यांचे सुचनेप्रमाणे खोपोली पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक श्री. शिरीष पवार यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक, राकेश कदम यांच्यासह विशेष पथक नेमुन दिनांक २२ डिसेंबर २०२२ रोजी वरची खोपोली व काटरंग परिसरातुन मोटरसायकल चोरी झाल्याचे दोन वेगवेगळे गुन्हे खोपोली पोलीस ठाणे येथे दाखल झाले होते सदर गुन्हयाचा तपासकरीत असताना घडलेल्या घटनेच्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तसेच शेडुंग टोलनाका येथील फुटेज पोशि/ ५९० दत्ता नुलके, पोशि/ ५२८ कादर तांबोळी यांनी संकलीत करून आरोपीत याने गुन्हयामध्ये वापरलेले चारचाकी वाहनाचा नंबर प्राप्त केला व त्यावरून आरोपी व त्याचे साथीदार यांचा शोध घेण्यासाठी मुंबई परिसरात रवाना झाले.
तपास पथकाला मिळालेल्या माहितीनुसार आरोपी हे कुर्ला चुनाभट्टी भागातील कुरेशीनगर येथील असल्याची माहिती मिळाली. तपास पथकाने सदर ठिकाणी जावुन चोरीस गेलेली दोन मोटार सायकल, चोरी करताना वापरण्यात आलेले फोर व्हिलर वाहन क्र. एमएच. ०२-एव्ही. ३३०३ तसेच तीन आरोपी यांना अटक करण्यात आली आहे. अटक आरोपी याने काटरंग व वरची खोपोली परीसरातुन चोरीस गेलेल्या दोन्ही मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली आहे.
खोपोली पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं. ४०५/२०२२ भा.द.वि. कलम ३७९, ३४ आणि खोपोली पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं. ४०६ / २०२२ भा.द.वि. कलम ३७९, ३४ मधील चोरीस गेलेल्या दोन्ही मोटार सायकल चुनाभट्टी कुर्ला येथुन आरोपीत यांच्याकडुन १,५०,००० /- रूपये किंमतीचा गुन्हयात चोरीस गेलेला माल खोपोली येथील विशेष तपास पथकाने जप्त केला आहे त्याचबरोबर गुन्हयात अटक आरोपी यांच्यावर यापूर्वी ३ ते ४ गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे.
सदर गुन्हयाचा तपास पोलीस अधीक्षक, रायगड मा. श्री. सोमनाथ घार्गे सो, अपर पोलीस अधीक्षक, रायगड मा.श्री. अतुल झेंडे सो, यांचे आदेशाप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी खालापुर, मा. श्री. संजय शुक्ला सो, यांचे सुचनेप्रमाणे खोपोली पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक श्री. शिरीष पवार यांचे मार्गदर्शनाखाली, मपोह/ १५६ गायकवाड, मपोना / ८१ हंबीर, हे तपास करीत असुन सहा. पोलीस निरीक्षक श्री. राकेश कदम, तपास पथकाचे पोह/१०८६प्रसाद पाटील, पोकॉ/ ५९० दत्ता नुलके, पोकॉ/ ५२८ कादर तांबोळी यांचे प्रयत्नातुन सदरचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत. अशी माहिती जन संपर्क अधिकारी पोलीस अधीक्षक रायगड यांचे कार्यालयातून देण्यात आली आहे.