मोटार सायकल चोरी करणा-या 2 अट्टल चोरट्यांना गोंदिया शहर पोलीसांनी केले जेरबंद..

उपसंपादक-रणजित मस्के
गोंदिया :– आरोपींकडुन मोटार सायकल केली हस्तगत–
याबाबत थोडक्यात हकीगत अशी की, फिर्यादी नामे अनमोल शालीकराम उके, रा. गांधी वार्ड, जुना गोंदिया, हे रेल्वे स्टेशन, गोंदिया परिसरात चाय विकण्याचे काम करतात…. दिनांक ०३/०४/२०२४ रोजी रात्री ०२.३० वा. दरम्यान त्यांचे हिरो होन्डा स्प्लेन्डर प्लस सिल्वर रंगाची मोटार सायकल क्र.एम.एच.३५/टी-६४९३ कि. २०,०००/-रु…नी रेल्वे स्टेशन, गोंदिया येथे गेले होते. मोटार सायकल रेल्वे स्टेशनचे बाहेर उभी करुन चाय विकण्याकरीता रेल्वे स्टेशन चे आत जावुन एका तासानी चाय विकुण परत आले असता मोटार सायकल ठेवलेल्या ठिकाणी दिसुन आली नाही. सदर मो.सा. कुणीतरी चोराने चोरून नेल्याने फिर्यादीचे तक्रारीवरून पो.स्टे. गोंदिया शहर येथे अप.क्रं. २२७/२०२४ कलम ३७९ भादवी. अन्वये दिनांक ०३/०४/२०२४ रोजी गुन्हा दाखल करण्यात आलेला होता…
सदर गुन्हयाचे तपासात चोरीस गेलेली मो.सा. व अज्ञात आरोपीचा शोध घेत असतांना पेट्रोलींग दरम्यान मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारे आरोपी १) अतुल अजय भावे, वय २२ वर्षे, रा. वाघाडे चौक, वार्ड नं.०५, फुलचुर, गोंदिया यास दि.०५/०४/२०२४ रोजी अटक करण्यात आले…. आरोपीकडे तपास केला असता त्याने त्याचा साथीदार नामे – 2) फैज उर्फ सोनु तौफीक कुरैशी, वय २७ वर्षे, रा.मंतर चौक, शास्त्री वार्ड, गोंदिया याचे सोबत मोटार सायकल चोरी केल्याचे सांगितल्याने फैज चा शोध घेतला असता तो त्याचे राहते घरी मिळुन आला… त्यास दि.०६/०४/२०२४ रोजी अटक करण्यात आलेली आहे… आरोपीतांकडे शिताफिने तपास केला असता आरोपी क्रं.०१ याचे कडुन चोरीस गेलेली हिरो होन्डा स्प्लेन्डर प्लस सिल्वर रंगाची मोटार सायकल क्र.एम.एच.३५/टी-६४९३ कि.२०,०००/-रु. ची जप्त करण्यात आली. सदर गुन्हयाचा तपास पो.हवा. प्रमोद चव्हाण, पो.स्टे. गोंदिया शहर हे करीत आहे. दोन्ही अटक आरोपीतांवर गोंदिया शहर व परिसरात चोरी, घरफोडी, जबरी चोरीचे एकुण १० गुन्हे दाखल आहेत.
सदरची कारवाई श्री. निखील पिंगळे, पोलीस अधिक्षक, गोंदिया, श्री. नित्यानंद झा, अपर पोलीस अधिक्षक, श्रीमती रोहीनी बानकर, उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग गोंदिया यांचे निर्देशाप्रमाणे पोलीस स्टेशन गोंदिया शहरचे पोलीस निरिक्षक श्री चंद्रकांत सुर्यवंशी यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहा. पोलीस निरिक्षक सोमनाथ कदम, पो.हवा. जागेश्वर उईके, सुदेश टेंभरे, कवलपाल भाटीया, निशिकांत लोंदासे, दिपक रहांगडाले, सतिश शेंडे, प्रमोद चव्हाण, म.पो.हवा. रिना चौव्हाण, पो.शि. अशोक रहांगडाले, दिनेश बिसेन, मुकेश रावते, सुभाष सोनवाने, कुणाल बारेवार यांनी केली.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com