विरार मध्ये मोटारसायकल चोरी करणा-या आरोपींकडुन गुन्हे शाखा कक्ष ३ कडून अटक करुन २ गुन्हयांची उकल…

0
Spread the love

प्रतिनिधी-अक्षय कांबळे

विरार:

दिनांक ०४/०८/२०२३ रोजी विरार पश्चिम स्टेशन परीसरातील पे अॅण्ड पार्क मध्ये पार्क केलेली बजाज पल्सर मोटारसायकल रजिस्ट्रेशन क्रमांक एमएच- ०२ – ईटी – ३६६१ तसेच दिनांक ०५/०८/२०२३ रोजी न्यु विवा कॉलेज, विरार विरार पश्चिम येथे पार्क केलेली होंडा अॅक्टिवा रजिस्ट्रेशन क्रमांक एमएच-४८- सीएच – ६१०६ या मोटारसायकल अज्ञात चोरट्यांनी चोरी करून नेल्याबाबत अनुक्रमे विरार पोलीस ठाणे गुन्हा रजि नंबर ७६९ / २०२३ भा.द.वी.सं. कलम ३७९ आणि अर्नाळा सागरी पोलीस ठाणे गुन्हा रजि नंबर २७१ / २०२३ भा.द.वी.सं. कलम ३७९ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.

दोन्ही दाखल गुन्ह्यांचे उपलब्ध सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रीक विश्लेषणव्दारे तपास करुन अर्नाळा सागरी पोलीस ठाणे दाखल गुन्ह्यामध्ये १ ) मामुन मल्लीक चौधरी वय २० वर्षे, रा. नालासोपारा पुर्व, ता. वसई, जि. पालघर २) अनुराग संदिप सिंग वय – १९ वर्षे, रा. ९० नालासोपारा पुर्व, ता. वसई, जि. पालघर तसेच विरार पोलीस ठाणे दाखल गुन्ह्यामध्ये १) ग्लेन फिलीक्स कस्टेलिनो वय २४ वर्षे, रा. साकीनाका पाईपलाईन, अंधेरी पूर्व, मुंबई २) पिटर फिलीक्स कस्टेलिनो वय ३१ वर्षे, रा. सदर यांना ताब्यात घेण्यात आले. गुन्ह्याच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या तपासामध्ये मामुन मल्लीक चौधरी आणि अनुराग संदिप सिंग यांनी मौजमजा करण्यासाठी तसेच ग्लेन फिलीक्स कस्टेलिनो आणि पिटर फिलीक्स कस्टेलिनो यांनी स्वतःच्या मालकीच्या पल्सर मोटारसायकलमध्ये दुसऱ्या मोटारसायकलचे पार्ट लावण्यासाठी चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे.

नमुद दोन्ही गुन्ह्यातील चोरी करण्यात आलेल्या २,२०,०००/- रुपये किंमतीच्या दोन्ही मोटारसायकल यातील आरोपींकडून हस्तगत करण्यात आल्या आहेत.

वरील कामगिरी श्री. अविनाश अंबुरे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), श्री. अमोल मांडवे सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) मि. भा. वि. व पोलीस आयुक्तालय यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट-३ चे पो.नि. प्रमोद बडाख, पोउपनिरी अभिजीत भुपेंद्र टेलर, उमेश भागवत, पो.हवा. अशोक पाटील, मनोज चव्हाण, मुकेश तटकरे, सचिन घेरे, सागर बारवकर, मनोज सकपाळ, अश्विन पाटील, पो.अं. राकेश पवार, सुमित जाधव, सुनिल पाटील, युवराज वाघमोडे, म.सु.ब सागर सोनवणे, गणेश यादव सफौ संतोष चव्हाण नेम सायबर सेल यांनी केली आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट