मोटार सायकल चोरणा-या इसमास चाळीसगाव शहर पो. स्टेशन गुन्हे शोध पथकातील पोलीसांनी शिताफीने ताब्यात घेवुन केली कारवाई…

उपसंपादक – रणजित मस्के
जळगाव :–
दिनांक 18/07/2023 रोजी सावरकर चौकातील महावीर झेरॉक्स दुकानासमोरुन फिर्यादी नामे सैय्यद आसिफ सैय्यद नवाज रा. तांबोळे बु, ता. चाळीसगाव यांची हिरो कंपनीची फॅशन प्रो. कंपनीची मोटार सायकल क्र. MH 43 T 8197 हि कोणीतरी अज्ञात इसमाने चोरून नेलेबाबत त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गुरनं. 349/2023 भादवि कलम 379 प्रमाणे 17/20 वा. गुन्हा दाखल झालेनंतर लागलीच मा. पोलीस निरीक्षक श्री. संदिप पाटील सो. यांनी गुन्हे शोध पथकातील पोना / 1720 राहूल सोनवणे, पोना / 3136 महेंद्र पाटील, पीना / 2800 भुषण पाटील, पोशि/ 2545 रविंद्र बच्छे, पोशि/447 समाधान पाटील, पोशि/1419 विजय पाटील, पोशि/ 2400 राकेश महाजन, पोशि/ 208 आशुतोष सोनवणे, पोकों / 3363 पवन पाटील, पोकॉ/552 ज्ञानेश्वर पाटोळे अशांचे पथक तयार करुन त्यांना सुचना देवून पो. स्टे. हद्दीत चोरीस गेलेल्या मोटार सायकल व अज्ञात आरोपीताचा शोध घेणेबाबत आदेशित केल्याने सदरचे पथक लागलीच पो. स्टे. हद्दीत रवाना केले.
सदर मो. सा. चारो बाबत माहीती घेता एक इसम सदर चोरलेल्या मो. सा. सह नागद रोड परिसरात फिरतांना मिळुन आल्याने त्यास पथकातील अंमलदार यांनी थांबविण्यासाठी इशारा दिला असता तो पळुन जावु लागला. त्याचा पाठलाग करुन त्यास नागद रोड वरील दिलीप गॅस एजन्सीजवळ पथकाताली अंमलदार यांनी ताब्यात घेतलं. तेव्हा त्यास विचारपुस केली असता त्याने त्याचे नाव अनिल विठ्ठल चव्हाण वय ३२ रा. सांगवीतांडा ता. चाळीसगाव असे सांगुन सदर गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. तरी सदर आरोपीतास चोरलेल्या मो.सा. सह ताब्यात घेवुन पो. स्टे. ला आणुन सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. तरी सदर गुन्ह्याचा तपास पोना 2800 भुषण पाटील हे करीत असुन आरोपीताने अजुन काही मो. सा. चोरीचे गुन्हे केले आहेत अगर कसे याबाबत पोलीस तपास करीत आहेत. तरी सदर पथकाने गुन्हा दाखल झालेनंतर (04 तासाचे आत सदरचा गुन्हा उघडकीस आणला आहे.

तरी सदरची कारवाई ही मा. श्री. एम. राजकुमार सो, पोलीस अधिक्षक जळगांव यांच्या आदेशाने व मा. श्री. रमेश चोपडे सो.. अपर पोलीस अधिक्षक चाळीसगांव तसेच मा. श्री. अभयसिंग देशमुख सो.. सहायक पोलीस अधिक्षक चाळीसगांव भाग चाळीसगांव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. संदिप पाटील सो. पोना / 1720 राहूल सोनवणे, पोना/3136 महेंद्र पाटील, पोना / 2800 भूषण पाटील, पोशि/2545 रविंद्र बच्छे पोशि/ 447 समाधान पाटील. पोशि/1419 विजय पाटील, पोशि/ 2400) राकेश महाजन, पोशि/ 2018 आशुतोष सोनवणे, पोका /3363 पवन पाटील, पोकां/552 ज्ञानेश्वर पाटोळे यांचे पथकाने केली आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com