मा. पोलीस अधिक्षक श्री. निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. अशोक बनकर, पोलीस उपअधीक्षक, (गृह ). याच्या मार्गदर्शनाखाली “भरोसा सेल आणि दामिनी पथकाद्वारे ” मार्गदर्शनपर कार्यशाळा संपन्न…

उपसंपादक-रणजित मस्के
गोंदिया :

🪷 मा. पोलीस अधीक्षक, गोंदिया श्री. निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक, श्री. अशोक बनकर, यांचे मार्गदर्शनाखाली आणि पोलीस उपअधीक्षक, (गृह ) श्रीमती. नंदिनी चानपुरकर यांचे मार्गदर्शन व देखरेखीखाली पोलीस अधीक्षक कार्यालय, गोंदिया येथे बालके,महिला व शाळकरी विद्यार्थी मुली यांचे सुरक्षिततेकरीता जिल्हा स्तरावर कार्यरत असलेल्या " भरोसा सेल व दामीनी पथकाव्दारे" दि. 04-10-2023 रोजी मौजा- डव्वा/कवलेवाडा येथील जी. ई.एस.हायस्कुल व कला कनिष्ठ महाविद्यालय, कवलेवाडा येथे जनजागृतीपर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
सदरची जनजागृतीपर कार्यशाळा मा. वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली निर्देश सूचना प्रमाणे पोलीस निरीक्षक श्रीमती - योगिता चाफले, पोउपनि- पूजा जाधव यांनी " भरोसा सेल व दामीनी पथकासह " मौजा- डव्वा/कवलेवाडा येथील जी. ई.एस. हायस्कुल व कला कनिष्ठ महाविद्यालय, येथे भेट देवून उपस्थीत असलेल्या विदयार्थी यांना समाजात महीला, आणि मुलींची होत असलेकी छेडछाड च्या घटनाबाबत तसेच बालकावर होणारे लैंगीक अत्याचार, बाल विवाह कायदा, सायबर फ्रॉड याबाबत जनजागृतीपर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच अशा प्रकारच्या घटना त्याचे सोबत घडल्यास त्याबाबत पोलीसांशी त्वरीत संपर्क करण्याबाबत सांगण्यात आले. दामिनी पथक महिला आणि मुलीं यांचे करीता कश्या पध्दतीने कामकाज करते त्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करून मुलींना आत्मसुरक्षा बाबत चे धडे देण्यात आले.
मा. वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली सदरची मार्गदर्शनपर जनजागृती कार्यशाळा पोलीस निरीक्षक -योगिता चाफले, पोउपनि- पूजा जाधव,सह पोहवा-तिरपुडे, चेतना पारधी, पो.शि रमेन्द्र बावनकर, वैशाली भांदक्कर, पुनम मंजुटे, चालक नेहा पाचे यांचेद्वारे घेण्यात येवून मार्गदर्शन करण्यात आले.


ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com