मोटार सायकल चोरी करणारे आरोपी अटक त्यांचेकडून ३,४०,०००/- रु. चा मुद्देमाल जप्त..

0
Spread the love

सह संपादक- रणजित मस्के

मिरज ;पोलीस स्टेशनमिरज शहरगु.घ.ता वेळ व ठिकाणदि. २५/०१/२०२५ रोजीचे २०,०० वा. ते २३.०० वा. चे दरम्यान मिरज गुरूवार पेठ, मिरज६ मोटार सायकली हस्तगतअपराध क्र आणि कलम४३/२०२५ बी.एन.एस. कलम ३०३ (२)गु.दा.ता वेळ०१/०२/२०२५ रोजी १३.०० वाकारवाई करणारे अधिकारी आणि अंमलदारमा. पोलीस अधीक्षक संदीप घुगे,मा. अपर पोलीस अधीक्षक रितु खोखर यांचे मार्गदर्शानाखालीफिर्यादी नावइम्रान हाय्युम मुल्ला, रा कदमवाडा, विटामाहिती कशी प्राप्त झालीपोह/सुर्यकांत साळुंखे पोशि/अभिजित ठाणेकरपोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्था. गु. अ. शाखा, सांगलीसहा पोलीस निरीक्षक, सिकंदर वर्धन, स्था. गु. अ. शाखा, सांगली पोहेकों / संजय पाटील, सुर्यकांत साळुंखे, अमोल लोहार, अतुल माने पोना/ सोमनाथ गुंडे, पोशि / सुनिल जाधव, अभिजित ठाणेकर, प्रमोद साखरपे, सुशांत चिलेपोशि/ कॅप्टन गुंडवाडे, सायबर पोलीस ठाणेअटक दिनांक दि. ०१/०२/२०२४ रोजीआरोपीचे नाव व पत्ता१) जावेद मिरासो मुजावर, वय ३५ वर्षे, रा हनुमान मंदिरजवळ, बुर्ली, ता पलूस२) उमेश रामचंद्र जाधव, वय ४९ वर्षे, रा आंधळी रोड, पलूस.उघडकीस आलेले गुन्हे१) मिरज शहर पोलीस ठाणे गु.र.नं. ४३/२०२५ बी.एन.एस. कलम ३०३ (२)२) विटा पोलीस ठाणे गु.र.नं. ५९५/२०२४ बी.एन.एस. कलम ३०३ (२)३) शिराळा पोलीस ठाणे गु.र.नं. ०७/२०२५ बी.एन.एस. कलम ३०३ (२)४) कराड शहर (सातारा) पोलीस ठाणे गु.र.नं. ७१/२०२५ बी.एन.एस. कलम ३०३ (२)५) शिरोळ (कोल्हापूर) पोलीस ठाणे गु.र.नं. २०८/२०२४ बी.एन.एस. कलम ३०३ (२)६) कराड ग्रामीण (सातारा) पोलीस ठाणे गु.र.नं. ६७/२०२५ बी.एन.एस. कलम ३०३ (२)जप्त मुद्देमाल१) ७०,०००/- रु किंमतीची १ सिल्व्हर हिरो कंपनीची यूनिकॉर्न मॉडेल मोटार सायकल जु. वा. कि. अ. २) १,६५,०००/-रू किंमतीची ३ काळया रंगाच्या हिंरो होंडा कंपनीची स्प्लेंडर प्लस मोटार सायकलीजु. वा. कि. अ.३) ७०,०००/- रु किंमतीची १ काळ्या रंगाची होंडा कंपनीची शाईन मॉडेल मोटार सायकल जु.वा.कि. अ.४) ३५,०००/- रु. किंमतीची १ काळया रंगाची हिंरो कंपनीची सीडी १०० मोटार सायकल जु. वा. कि. अ.३,४०,०००/-रू. एकूणगुन्हयाची थोडक्यात हकीकतमा. पोलीस अधीक्षक संदीप घुगे, यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस मालमत्तेविरुध्दचे गुन्हे करणारे इसमांची माहिती काढुन त्यांचेचर कारवाई करून, मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते.सदर आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक सतिश शिदे, स्था. गु. अ. शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा. पोलीस निरीक्षक, सिकंदर वर्धन व स्टाफ यांचे एक पथक तयार करुन मोटार सायकल चोरीचे गुन्हे करणारे संशयित इसमांची माहिती काढुन त्यांचेवर कारवाई करणेकरीता आदेशीत केले होते.त्या अनुशंगाने मिरज विभागात पेट्रोलिंग करीत असताना सहा पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांचे पथकामधील पोह/सुर्यकांत साळुंखे व पोशि/अभिजित ठाणेकर यांना त्यांचे बातमीदाराकडून बातमी मिळाली की, मिरज येथे पंचशीलनगर चौकात विना नंबर प्लेटची मोटार सायकल वरून दोन इसम संशयितरित्या फिरत आहेत.नमुद पथक हे मिळाले बातमीप्रमाणे मिरज येथील पंचशीलनगर चौकात जावून बातमीप्रमाणे वॉच केला असता रोडचे कडेला बातमीप्रमाणे दोन इसम विना नंबर प्लेट मोटार सायकलीसह थांबलेले दिसले. तसा त्यांचा बातमीप्रमाणे संशय आल्याने त्यांना सहा पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन व पथकाने पळून जाण्याची संधी न देता त्यांना मोटार सायकलसह ताब्यात घेवून त्यांना त्यांचे नाव गाय विचारता त्यांनी त्यांची नावे १) जावेद मिरासो मुजावर, वय ३५ वर्षे, रा हनुमान मंदिरजवळ, बुर्ली, ता पलूस २) उमेश रामचंद्र जाधव, वय ४९ वर्षे, रा आंधळी रोड, पलूस अशी सांगितली. सहा पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांनी त्यांचे अंगझडतीचा उददेश कळवून पंचासमक्ष त्यांचेकडे असलेल्या मोटार सायकलीच्या मालकी हक्काबाबत विचारणा केली असता, काही दिवसापूर्वी गुरूवार पेठ, मिरज येथून रात्रीचे वेळेत सदरची मोटार सायकल चोरी केली होती. ती मोटर सायकल विक्री करण्यासाठी या ठिकाणी आले असल्याची कबूली दिली. त्यांना आणखी विश्वासात घेवून त्यांचेकडे अधिक तपास केला असता त्यांनी सांगितले की, गेले सात ते आठ महिन्यापासून वेगवेगळ्या ठिकाणावरून आणखी काही मोटार सायकली चोरी केलेल्या आहेत. त्या मोटर सायकली आम्ही मिरज येथील कृषी बाजार समिती, मिरज मध्ये बंद अवस्थेमधील सिटी सर्व्हे ऑफिसचे मोकळ्या जागेत ठेवलेल्या आहेत. त्या मोटार सायकली विक्री करावयाच्या आहेत म्हणून त्यातील एक मोटर सायकल घेवुन ते विक्री करीता आले असल्याचे सांगितले. लागलीच दोन पंचासमक्ष नमूद दोन्ही ठिकाणांचा पंचनामा करुन एकूण ६ मोटार सायकली ताब्यात घेऊन तसा सविस्तर पंचनामा करण्यात आला.सदरच्या मिळालेल्या मोटार सायकलीबाबत पोलीस ठाणेचा क्राईम अभिलेख पडताळला असता मिरज शहर पोलीस ठाणे, विटा पोलीस ठाणे, शिराळा पोलीस ठाणे, कराड शहर (सातारा) पोलीस ठाणे, कराड ग्रामीण (सातारा) पोलीस ठाणे, शिरोळ (कोल्हापूर) पोलीस ठाणेस मोटार सायकल चोरीचे गुन्हे दाखल असल्याची खात्री झाली.सदर गुन्हयातील आरोपी जावेद मिरासो मुजावर हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याचे वर यापूर्वी पलूस पोलीस ठाणेस मोटार सायकल चोरीचे गुन्हे दाखल आहेत.सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपास कामी मिरज शहर पोलीस ठाणेकडे वर्ग करण्यात आला असुन पुढील तपास मिरज शहर पोलीस ठाणे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट