मोटार सायकल चोरी करणारा गुन्हेगारा कडुन 3,67,000/- रुपये किमंती वेगवेगळ्या कंपनीच्या 15 मोटार सायकली स्था. गुन्हे शाखा जालना यांनी केल्या जप्त

0
Spread the love

सह संपादक -रणजित मस्के

जालना

जालना जिल्ह्यातील मोटार सायकल चोरी चे गुन्हे उघडकीस आणणे बाबत मा.श्री. अजय कुमार बंसल, पोलीस अधीक्षक जालना, मा. श्री. आयुष नोपाणी, अपर पोलीस अधीक्षक जालना यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. पंकज जाधव व पथकास सुचना दिल्या होत्या.

त्यावरुन पोलीस निरीक्षक श्री. पंकज जाधव स्थागुशा जालना यांचे मार्गदर्शनाखाली स्थागुशाचे पथक तयार करुन कारवाई करण्या बाबत मार्गदर्शन केले होते. त्या अनुषंगाने दिनांक 10/06/2025 रोजी स्थागुशा येथील पथक मोटार सायकल चोरी करणारे गुन्हेगारां बाबत माहिती घेत असतांना त्यांना गुप्त बातमीदार व तांत्रिक विश्लेषण आधारे माहिती मिळाली की, रेकॉर्ड वरील आरोपी नामे कृष्णा जालिंदर सोमवारे रा. धनगरगल्ली घनसावंगी हा मोटार सायकल चोरी करीत असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली.

त्यावरुन सदर पथकाने कृष्णा जालिंदर सोमवारे रा. धनगरगल्ली घनसावंगी याचा शोध घेऊन त्यास दिनांक 10/06/2025 रोजी घनसावंगी येथून ताब्यात घेतले. त्यास गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपुस करता त्याने जालना शहरातुन विविध भागातुन मंठा येथील आठवडा बाजार, मंटा गावातुन, अंबड आठवडी बाजार, मत्सोदरी मंदीर परिसर, घाटी दवाखाना व एम.आय.डी. परिसर छत्रपती संभाजीनगर, नाथ मंदीर पैठण अशा ठिकाणाहून मोटार सायकल चोरी केल्याचे सांगितले आहे.

सदर आरोपी कडुन खालील प्रमाणे जालना जिल्हा व छत्रपती संभाजीनगर शहर व ग्रामिण येथे दाखल असलेले मोटार

असा एकूण 3,67,000/- रुपयाचा माल जप्त करण्यात आला आहे. आरोपीस पुढील गुन्ह्याचे तपास कामी पोलीस ठाणे कदिम जालना यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सदर ची कारवाई ही मा.श्री.अजय कुमार बंसल (भापोसे) पोलीस अधीक्षक जालना, मा.श्री. आयुष नोपाणी (भापोसे) अपर पोलीस अधीक्षक जालना यांचे मार्गदर्शनाखाली श्री. पंकज जाधव, पोलीस निरीक्षक स्थागुशा जालना, श्री. योगेश उबाळे, सहा.पो.निरी, श्री. राजेंद्र वाघ, पोउपनि, ASI/रामप्रसाद पव्हरे, पोहवा प्रभाकर वाघ, लक्ष्मीकांत आडेप, गोपाल गोशिक, प्रशांत लोखंडे, संदिप चिंचोले जगदीश बावणे, कैलास खार्ड, विजय डिक्कर, रुस्तुम जैवाळ, सागर बाविस्कर, संभाजी तनपुरे, देविदास भोजने, सतिपस श्रीवास, आक्कुर धांडगे, कैलास चेके, धिरज भोसले, भागवत खरात, योगेश सहाने, सोपान क्षीरसागर, रमेश काळे, किशोर पुंगळे सर्व स्थानिक गुन्हे शाखा जालना यांनी केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *