मोटार सायकल चोरी करणारा अट्ट्ल आरोपी सुनिल राहांगडाले स्थानिक गुन्हे शाखा गोंदिया पोलिसांचा जाळ्यात ..

सह संपादक -रणजित मस्के
गोंदिया

आरोपीकडून एकुण ६००००/- रूपये किंमतीची २ मोटारसायकल जप्त स्थानिक गुन्हे शाखा, गोंदिया पथकाची धडक कामगीरी
दिनांक २७/07/2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखा, गोंदिया येथील पथक पोलीस ठाणे रामनगर हद्दीत पेट्रोलीग करीत असतांनी गुप्त बातमीदारांकडुन खात्रीशीर माहिती मिळाली कि पोलीस स्टेशन रामनगर अपराध क्रमांक ३२५/२०२५ कलम ३०३ (२) भारतीय न्याय संहिता मधील चोरीस गेलेली मोटार सायकल सराईत गुन्हेगार सुनिल राहांगडाले रा.हिरापुर याचेकडे असल्याची व तो सदर चोरीची मोटार सायकल विक्रीच्या ईराद्याने हिरापूर व गोरेगाव परीसरात फिरत आहे. सदर माहीतीच्या आधारे पोलीस पथक हिरापूर येथे गेले असता सुनिल राहांगडाले रा.हिरापुर हा चौकात दिसून आला . त्यास ताब्यात घेवून नमुद गुन्ह्यातील चोरी गेलेली मोटार सायकल बाबत विचारपुस केली असता, त्याने पेंशन प्रो. मोटार ही मरारटोली, गोंदिया बस स्टॉप परीसरातून चोरी केली असून सदर मोटार सायकल ही त्याच्या ताब्यात असल्याचे सांगितले. तसेच दुसरी पेंशन प्रो मोटार सायकल ही टि.बी. टोली परीसरातून चोरी केल्याचे सांगून सदर मोटार सायकल ही रजेगांव (म.प्र.) परीसरात ठेवली असल्याचे सांगितले.
सुनिल राहांगडाले रा.हिरापुर याचे ताब्यातुन १) एक हिरो मोटोकॉपों, ली. कंपनीची काळ्या रंगाची सिल्वर पट्टा असलेली पेंशन प्रो. मोटार सायकल किंमती ४०,०००/- २) एक हिरो कंपनीची काळ्या रंगाची मोटार सायकल किमती २०,०००/- रु अशा एकुण ६००००/- रूपये किंमतीची २ मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.
सदरची दोन्ही मोटार सायकल पोलीस ठाणे रामनगर अप.क्रं. ३२५/२०२५ व २३३/२०२५ गुन्हयात चोरीस गेलेली असल्याने सदर आरोपी यास पुढील तपासकामी पोलीस स्टेशन रामनगर येथे स्वाधीन करण्यात आले आहे.
सदरची कामगीरी श्री. गोरख भामरे, पोलीस अधिक्षक, गोंदिया, स्थानिक गुन्हे शाखा गोंदियाचे पोलीस निरीक्षक श्री पुरुषोत्तम अहेरकर यांचे मार्गदर्शना खाली सपोनि.धिरज राजुरकर , पोहवा गायधने, पोहवा इंद्रजित बिसेन, पोहवा सुबोध बिसेन, पोहवा दुर्गेश तिवारी, पो. शि. हंसराज भांडाकर/२०७०, पो.शि. संतोष केदार, चापोशि कुंभलवार यांनी केली आहे.