मोटार सायकल चोरी करणा-या टोळीतील ३ सराईत गुन्हेगार व १ विधी संघर्षीत बालक यांच्या ताब्यातुन एकुण १०,४०,०००/- रूपये किंमतीच्या १५ चोरीच्या मोटार सायकलसह नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट क. १ ने केली कारवाई…

सह संपादक -रणजित मस्के
नाशिक

नाशिक शहरात मोटार सायकल चोरीचे प्रमाण वाढले असल्याने मोटार सायकल चोरी करणा-या इसमांचा शोध घेवुन त्यांचेवर कठोर कारवाई करणे बाबत मा. पोलीस आयुक्त नाशिक शहर श्री. संदीप कर्णीक यांनी आदेशित केले होते, त्या अनुषगांने मा. पोलीस उपायुक्त श्री. किरणकुमार चव्हाण, मा. सहा. पोलीस आयुक्त श्री. संदीप मिटके यांनी गुन्हे शाखेचे पथक तयार करून त्यांना सदर आरोपीतांचा शोध घेण्याबाबत सुचना केल्या होत्या.
त्या अनुषंगाने गुन्हेशाखा युनिट कमांक १ कडील अधिकारी व अंमलदार असे सरकारवाडा पोलीस ठाणे कडील । गुरुवं २०४/२०२५ भा. न्या. सं. कलम ३०३(२) प्रमाणे दाखल गुन्हयाचा समांतर तपास करीत असतांना पोअं/९९ गोरक्ष साबळे, पोअं/२०२१ राम बर्डे, पोअं/२०६९ विलास चारोस्कर व पोअं/१४०५ आप्पा पानवळ यांना त्यांचे गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, सदर आरोपी हे चोरीची होंडा कंपनीची काळ्या रंगाची यूनिकॉर्न मोटार सायकलवर बसुन निलगिरी बाग, छ. संभाजीनगर रोड, पंचवटी, नाशिक परीसरात येणार असल्याची खात्रीशिर बातमी मिळाली, सदरची बातमी गुन्हे शाखा युनिट -१ चे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. मधुकर कड यांना देयुन त्यांनी पोउनि/चेतन श्रीवंत, पोहवा/महेश साळुंके, पोल्वा/रविंद्र आढाव, पोहवा /उत्तम पवार, पोहवा/देविदास ठाकरे, पोअं/विलास बारोस्कर, पोअं/गोस्न साबळे, पोअं/राम बर्डे, पोअं/आप्पा पानवळ, पोअं/राहुल पालखेडे, पोअं/नितीन जगताप यांचे पथक तयार करून त्यांना मार्गदर्शन करून स्वाना केले नमुद पथकाने निलगिरी बाग, छ. संभाजीनगर रोड, पंचवटी, नाशिक येथे सापळा लावला असता मिळालेल्या बातमी नुसार इसम नामे १) सत्यम उर्फ देवा मिलींद गरूड वय २१ वर्षे राहणार आमदार मळा, कच्चरापट्टी जवळ, माऊली चाळ, ओझर, ता. निफाड, जि. नाशिक, २) साहिल आइसद शेख वय २१ वर्षे राहणार-दहाव्या मैलाच्या पुढे, टिळकनगर कॉलेजच्या बाजूला, भगतसिंग नगर, ओझर, ता. निफाड, जि. नाशिक यांना ताब्यात घेवून त्यांच्या ताब्यातुन ६०,०००/-रूपये किंमतीची चोरीची काळया रंगाची यूनिकॉर्न मोटार सायकल ताब्यात घेतली. तसेच आरोपीतांकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी व त्याचे साथीदार नाशिक शहर व नाशिक ग्रामीण भागातुन एकुण १५ मोटार सायकली चोरी करून त्या विधीसंघर्षित बालक व खेडगाव येथील विकास कसीलाल कुमावत वय २३ वर्षे राहणार ब्राम्हण गल्ली, खेडगाव, ता. दिंडोरी, जि. नाशिक यांच्याकडे विक्री करीता दिले असल्याचे सांगितल्याने सदर इसमांना ताब्यात घेवुन त्यांच्याकडुन ९,८०,०००/-रूपये किंमतीच्या एकुण १४ मोटार सायकली मिळुन आल्या अशा एकुण १०,४०,०००/-रूपये किंमतीच्या १५ मोटार सायकली मिळून आल्याने त्याबाबत गुन्हे अभिलेखाची पडताळणी केली
चोरीच्या मोटार सायकल बाबत अभिलेखावर अदयाप पायेतो गुन्हे दाखल असल्याबाबत कोणतीही माहिती प्राप्त झालेली नसुन सदर गाडयांचे रजिस्टेशन नंबर, बेसिस नंबर व इंजिन नंबर यावरून संबंधित गाडी मालकांनी कागदपत्रांसह सस्काखाडा पोलीस ठाणे, नाशिक शहर यांच्याशी संपर्क साधावा, वरील आरोपीतांवी वैदयकीय तपासणी करून त्यांना गुन्हयाचे पुढील तपासकामी सरकारवाडा पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आले असुन पुढील तपास सरकारवाडा पोलीस ठाणे करीत आहे.
सदरची कामगीरी मा. श्री. संदिप कर्णिक, पोलीस आयुक्त व मा. श्री. किरणकुमार चव्हाण, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे), मा.श्री. संदिप मिटके, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हेशाखा यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट क. १ नाशिक शहर कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. मधुकर कड, सपोनि/हिरामण भोये, पोउनि/चेतन श्रीवंत, पोउनि/सुदाम सांगळे, पोलवा/महेश साळुंके, पोहवा/रविंद्र आढाव, उत्तम पवार, देविदास ठाकरे, रोहिदास लिलके, योगीराज गायकवाड, धनंजय शिंदे, पोअं/विलास चारोस्कर, गोरक्ष साबळे, राम बर्डे, आप्पा पानवळ, राहुल पालखेडे, नितीन जगताप, जगेश्वर बोरसे, मपोहवा/शर्मिला कोकणी, मपोअं/अनुजा येलवे, मनिषा सरोदे, चालक श्रेणी पोउनि/किरण शिरसाठ, पोवा/सुकाम पवार, पोअं/समाधान पवार अशांनी केलेली आहे.