उपचारासाठी परदेशातुन आलेल्या नागरिकांना लुबाडणारी परराजीय टोळीचा पुणे ते दमण मार्गावरिल ६०० पेक्षा जास्त सीसीटिव्हिची पाहणी करुन कोंढवा तपास पथकाने केला पदाफार्श..

उपसंपादक- रणजित मस्के
पुणे :– सौदी भागातील यमन देशातील नागरिक हे कोंढवा भागात मोठया प्रमाणात उपचारासाठी येत असतात सदर नागरिकांना भारत देशात प्रचिलीत असणा-या भाषा बोलत येत नाही. तसेच अश्या नागरिकांचा पेहराव ही वेगळा असल्याने ते लागलीच दृष्टीक्षेत्रात येतात.
कोंढवा भागात राहणा-या परदेशी नागरिक सालेह ओधमान एहमद, वय-५२ वर्षे, मुळ रा. एमेन देश हे त्याचे पत्नीच्या उपचारासाठी पुण्यात आले होते.
ते दि.०८/०२/२०२४रोजी सायंकाळी आशिर्वाद चौकात त्याचे पत्नीसह पायी जात असताना चार चाकी हॉन्डा सिटी गाडी त्याच्या जवळ येऊन उभी करून सदर गाडीतील इसम हे त्याच्याशी अरबी भाषेत बोलुन ते पोलीस असल्याचे सांगीतले व तुमच्याकडे असणा-या वस्तूंची तसेच तुमच्या ओळखपत्राची पडताळणी करायची आहे असे सांगून, जवळ बोलावले.
त्यावेळी त्याने त्याचे ओळखपत्र दाखवल्यासारखे केले. त्यावेळी परदेशी नागरिक घाबरुन गाडीतील व्यक्ती पोलीस असल्याबाबत विश्वास बसल्याने, त्यांनी खिशातील, कागदपत्रे त्याला दाखवत असताना, सोबत खिशातील पैसे देखील त्याला दिले, त्यावेळी गाढीतील इसमांनी कागदपत्रांचा व पैशाचा नाकाने वास घेवून, तपासात असल्याचे दाखवले. काही समजायच्या आत परदेशी नागरिकाकडुन सौदी ५०० रियाल, ३००० अमेरीकन डॉलर, ५३,०००/- रुपये भारतीय रोख रक्कम असा मुद्देमाल चोरी करुन पळुन गेले होते.
नमुदबाबत कोंढवा पोलीस ठाणे पुणे येथे गु.रं.न.कलम १४६/२०२४, भा दं वि कलम १७०, ४१९, ४७१, ४२०, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयाप्रमाणे कोंढवा पोलीस ठाणे येथे येमेन देशातील नागरिक अब्दुल फताह सालेह मोहसेन, वय ४७ वर्षे, मुळ रा. येमेन यांना ही नमुदप्रमाणे फसवणुक करुन चोरी केली होती. त्याबाबत कोंढवा पोलीस ठाणे पुणे येथे गु.रं.न. कलम. ९६४/२०२३, भादवि कलम ४२०,४०६,४१९,१७१,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर दोन्ही गुन्हयातील टोळीचा शोध घेण्याबाबत सुचना वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे, पोलीस निरीक्षक गुन्हे मानसिंग पाटील यांनी दिल्या होत्या सदरप्रमाणे तपास पथक अधिकारी लेखाजी शिंदे, सहा. पोलीस निरीक्षक, व त्याचे पथक हे आरोपी यांचा शोध घेत असताना पोलीस अंगलदार सुहास मोरे, राहुल थोरात, जयदेव भोसले यांना गुन्हयाच्या घटनास्थळावर आशीर्वाद चौक येथे आरोपी यांनी त्याच्याकडील होन्डा सिटी गाडी क्र.एम.एच.१२ इ.जी.४२६६ मधुन येवुन चोरी केल्याचे सीसीटिव्हि फुटेज प्राप्त झाले होते.
सदर फुटेजच्या माध्यमातुन आरोपी यांच्या गाडीचा माग काढुन खडीमशीन चौक मार्गे कात्रज नवले बीज वारजे डुक्कर खिंड- बाणेर- हिंजवडी येथील एनपीआर कॅमेराची पाहणी केली असा आरोपी यांनी नमुद ठिकाणी गाडीचा नंबर बदलुन DL4CAH 4960 हा नंबर लावलेला दिसुन आला. सीसीटिव्हिच्या माध्यमातुन सदरबी गाडी ही तळेगाव उसे टोल नाका, याठिकाणावरुन पास होऊन खालापुर टोल नाका ते नवी मुंबई ते तुर्मे- ठाणे- पालघर-खणीवडे टोल नाका, चारोटी टोल नाका उहाणु घोलवड गुजरात राज्याच्या हदीतुन केंद्र शासित प्रदेश दमण याठिकाणी देवका बीच हॉटेल सिल्टॉन येथे दि.०९/०२/२०२४ रोजी पहाटे ०३.०० वा पोहचल्याचे निष्पन्न झाले.
आरोपी सदर हॉटेलवर राहिलेने त्यांची ओळखपत्राव्दारे माहिती मिळुन आली. घटना घडल्यापासून १० तास ३० मिनिटांचा कालावधी हा ६०० पेक्षा जास्त सीसीटिव्हि फुटेज तपासुण पुणे ते दमण असे ३५० किलो मीटरचा प्रवास करुन आरोपी
१) सिंकदर अली खान, वय ४४ वर्षे, रा.बी-३९, राजदूत हॉटेल जवळद्ध तंगपुरा दक्षिण दिल्ली,
२) करिम फिरोज खान, वय २९ वर्षे, रा.१८ तिसरा मजला आय बलक कस्तुरबा नगर लाजपतनगर साऊथ दिल्ली
३) इरफान हुसेन हाशमी, वय ४४ वर्षे, रा.बी-३९ राजदूत हॉटेल जवळ, जंगपुरा दक्षिण दिल्ली
४) मेहबुब अब्दुल हमदी खान, वय ५९ वर्षे, रा. बी-३९ राजदुत हॉटेल जवळ, जंगपुरा दक्षिण दिल्ली यांनी गुन्हा केल्याचे निष्पन्न करुन त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
तसेच आरोपी यांच्याकडे कौशल्यपूर्ण तपास करुन त्याच्याकडुन
१) कोंढवा पोलीस ठाणे पुणे येथे गु.रं.न. कलम, १४६/२०२४, मा.दं. वि. कलम. १७०,४१९,४७१,४२०,३४,
२) कोढवा पोलीस ठाणे
पुणे येथे गु.रं.न.कलम.९६४/२०२३, मा.दं. वि. कलम ४२०,४०६,४१९,१७१,३४ प्रमाणे दाखल असणारे २ गुन्हे केल्याचे
उघड करुन त्याच्याकडुन दोन्ही गुन्हयातील ३०००/- अमेरीकन डॉलर, ५००/- सौदी रियाल, ५३,०००-००/-रुपये
रोख रक्कम, व गुन्हा करण्यासाठी वापरलेली २,००,०००/-रु कि होंन्डा सिटी कार ही जप्त करण्यात आली आहे.
वरिलप्रमाणे कामगिरी मा. अमितेशकुमार सो पोलीस आयुक्त, मा. मनोज पाटील साो, अपर पोलीस आयुक्त, पूर्वे प्रादेशिक विभाग, मा.आर राजा, पोलीस उप आयुक्त सो परि.०५. मा. गणेश इंगळे, सहा. पोलीस आयुक्त, वानवडी विभाग, संतोष सोनवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मानसिंग पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) यांच्या मार्गदर्शन व सुचनाप्रमाणे सहा. पोलीस निरीक्षक लेखाजी शिंदे, सहा. पोलीस निरीक्षक दिनेश पाटील, पोलीस अंमलदार अमोल हिरवे, जयदेव भोसले, राहुल थोरात, सुहास मोरे, अभिजीत रत्नपारखी, अभिजीत जाधव, शंशाक खाडे, विकास मरगळे, आशिष गरुड, रोहित पाटील, अक्षय शेडगे, राहुल रासगे, राहुल वजारी यांनी केली आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com