पालघर जिल्ह्यातील साडेचार लाखापेक्षा जास्त ज्येष्ठ नागरिकांनी एसटीचा मोफत प्रवास या योजनेचा घेतला लाभ :- केदार काळे प्रवक्ता शिवसेना
प्रतिनिधी-महेश वैद्य
पालघर: दिनांक 5 एप्रिल 2023 रोजी
महाराष्ट्र सरकारने 75 वर्षापेक्षा जास्त असलेला जेष्ठ नागरिकांसाठी अमृत ज्येष्ठ नागरिक योजना ऑगस्ट 2022 महिन्यापासून सुरू केली.
आठ महिन्यात पालघर विभागातील 452390 जेष्ठ नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतला .
महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांनीही योजना ऑगस्ट 2022 महिन्यात घोषित केली .तेव्हा या योजनेवर सोशल मीडियावर टीका झाली .
75 वर्षावरील नागरिक प्रवास करणार का ? असेही प्रश्न उपस्थित केले .
तसेच आता 95 वर्षांवरील जेष्ठ नागरिकांना विमान प्रवासी मोफत द्या असे टोमणे टीका आदरणीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब व महाराष्ट्र सरकारवर केली गेली .पण ह्या योजनेचा ज्येष्ठ नागरिकांना उपयोग झाला आहे. हे आकडेवारीवरून सिद्ध झाले आहे .
संपूर्ण महाराष्ट्रात या योजनेला भरभरून प्रतिसाद मिळालाआहे .
पालघर जिल्ह्यातील पालघर- सफाळे- वसई अर्नाळा -डहाणू- जव्हार- बोईसर – नालासोपारा ह्या आठही डेपो मधून साडेचार लाखापेक्षा जास्त ज्येष्ठ नागरिकांनी याचा लाभ घेतला . हा लाभ एसटीच्या सर्व बस गाड्यांसाठी आहे .त्यासाठी 75 वर्ष पूर्ण झाल्याचा पुरावा प्रवाशांना सोबत ठेवायचा आहे. उदाहरणार्थ पुढील पैकी एक पुरावा – आधार कार्ड / निवडणूक कार्ड /ड्रायव्हिंग लायसन /पासपोर्ट/ स्मार्ट कार्ड/ शासनाने दिलेली कार्ड ज्यावर फोटो व जन्मतारीख असेल. तसेच 65 ते 75 वर्षांमधील जेष्ठ नागरिकांसाठीही एसटी प्रवासात 50 % सवलत आहे 65 ते 75 वर्षांमधील जेष्ठ नागरिकांना शिवशाहीत 45% तर स्लीपर साठी 30 % सवलत आहे. आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आपल्या विरोधकांना कामातून उत्तर देत असतात.
विरोधकांनी कितीही विरोध करून देत.टीका करून देत , आदरणीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली सरकार हे जनतेच्या कल्याणासाठी अनेक चांगले निर्णय घेत आहे व त्याचे अंमलबजावणीही करीत आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com