जिल्हास्तरीय नार्को को-ऑर्डीनेशन सेंटर N-CORD समितीचे मासिक बैठकीचे वेळी आगामी लोकसभा निवडणुकीचे पार्श्वभुमीवर जिल्हयातील अंमली पदार्थ विरोधातील कारवाई प्रभावीपणे करणे बाबत मा. जिल्हाधिकारी, ठाणे यांचे कडुन निर्देश जारी …

उपसंपादक-रणजित मस्के
ठाणे :- दिनांक १९/०४/२०२४ रोजी मा. जिल्हाधिकारी, ठाणे यांचे अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय नार्को को- ऑर्डीनेशन सेंटर N-CORD समितीची मासिक बैठक पार पडली. आगामी लोकसभा निवडणुकी चे अनुषंगाने जिल्हयात अंमली पदार्थाची साठवणुक, विक्री, निर्मीती होणार नाही. यासाठी सर्व यंत्रणांनी दक्षता घ्यावी. त्यानुषंगाने जिल्हयातील रासायनिक कंपन्या, गोदामे, फार्म हाऊस इत्यादीची प्रभावीपणे तपासणी करावी असे निर्देश मा. जिल्हाधिकारी, ठाणे यांनी बैठकीचे वेळी सर्व समिती सदस्यांना दिले.

तसेच आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ठाणे जिल्हयात इतर राज्यातुन अथवा परदेशातुन कोण्यात्याही अंमली पदार्थाची तस्करी होऊ नये. यासाठी सर्व यंत्रणांनी सतर्क रहावे. अशा घटनांच्या प्रतिबंधात्मक उपायासाठी आराखडा तयार करावा, जिल्हयात कोरेक्स, बटण तसेच इतर अंमली पदार्थाची अवैध विक्री करणा-या औषध दुकानांची तपासणी करुन दोषीविरुध्द कारवाई करावी. अंमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार गुन्हे दाखल असलेल्या आरोपीतां विरुध्द योग्यती प्रतिबंधात्मक कारवाई करावी असे निर्देश मा. जिल्हाधिकारी, ठाणे यांनी यावेळी दिले.
सदर बैठकीला समितीचे संयोजक सदस्य अपर पोलीस अधिक्षक, ठाणे ग्रामीण डॉ. दिपाली धाटे, ठाणे पोलीस आयुक्तालयाचे सहाय्यक पोलीस आयुक्त इंद्रजित कार्ले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय शिंदे, मिरा-भाईन्दंर वसई-विरार पोलीस आयुक्तालयाचे सहाय्यक पोलीस आयुक्त मदन बल्लाळ, पोलीस निरीक्षक, अमर मराठे, नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे पोलीस निरीक्षक, निरज चौधरी, औद्यागिक सुरक्षा व आरोग्य विभागाचे एल. के. घोरने, जिल्हा कृषी अधिक्षक, दिपक कुटे, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त रा. प. चौधरी, जिल्हा शल्य चिकित्सकाचे डॉ. विजय सांळुखे, राज्य उत्पादन विभागाचे उप अधीक्षक, एस. टी. माळवे, वन विभागचे वन क्षेत्रपाल प्रियंका हिरे, जिल्हा आरोग्य विभागाचे संजय जाधव, जिल्हा शिक्षण विभागचे वर्षा सोनटक्के, केंद्रीय वस्तु व सेवा कर विभागाचे संजय गणवीर, टपाल विभागाचे दिनेश शिंगरे तसेच ठाणे ग्रामीण, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सुरेश मनोरे आदी उपस्थित होते.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com