मासिक 10 % चक्रवाढ व्याज वसूल करुन धमकावणाऱ्या सावकारांना टिळक नगर पोलीसांनी केली अटक…….

0
Spread the love

मुंबई : चेंबूर येथील गरजू नागरिकांना 10 % मासिक व्याज दराने तिप्पट पैसे उकळत धमकावणाऱ्या अनधिकृत सावकारांना मुंबईत टिळक नगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत .

चेंबूर येथील हा सावकार हा मासिक 10 % व्याज घेत असे व तिप्पट पैसे देऊनही गरजूंना धमकावत असे आणि जीवे मारणाची धमकीही देत असे 1)राहुल अण्णा गुंजाळ आणि 2) चक्रधर विप्रचरण नायक अशी अटक करण्यात आलेल्या 2 अनधिकृत सावकाराची नावे आहेत.
मुंबईतील चेंबूर विभागात रहाणारे डॉक्टर श्री. सुनील इनामदार यांनी 2 वर्षांपूर्वी आपल्या घरगुती कारणासाठी मध्यस्थ्यामार्फत 2 लाख 50 हजार रुपयाचं कर्ज 10% व्याजाने या सावकाराकडून घेतले होते. त्यावेळी त्या सावकारांनी बॉण्ड पेपरवर त्यांच्याकडून 2 लाख 50 हजार रुपये घेतल्याचे लिहून घेतले होते परंतु एजंटची फी आणि पहिला हप्ता असे सांगून 50 हजार कापून फक्त 2 लाख रुपये त्यांना दिले. त्याच बरोबर या रकमेवर 10% मासिक व्याज देखील लावत त्यांच्याकडून कोऱ्या चेकवर सह्या घेतल्या. एवढेच नाही तर त्यांची मोटारकार देखील त्यांनी त्यांचाकडे ठेवून घेतली होती. तिथपासून आरोपी (सावकार)हे या कारचा वापर आपल्या कामासाठी करत होते. इतकेच नाहीतर आरोपी सावकारांनी वाहतुकीच्या नियमाचे वारंवार उल्लघंन केल्याप्रकरणी गाडीवर 9 हजार 500 रूपयांचा दंड देखील आकारण्यात आला होता. याबाबतची नोटीस कोर्टाने डाॅ. सुनील यांना पाठविली होती. डॉ सुनील यांनी आतापर्यंत 10 % दराने आरोपी सावकारांना 6 लाख 50 हजार रुपये फक्त व्याज दिले आहेत.

ज्यावेळी डॉ. सुनील हे जेव्हा 2 लाख 50 रुपये घेऊन आपली गाडी सोडवण्यास या सावकारांकडे गेले असता त्यांनी त्यांच्याकडे आणखी 5 लाख रूपयांची मागणी केली. एवढेच नाही तर पुढे ऑक्टोबर महीन्याचा 25 हजार रुपये हप्ता न दिल्याने त्यांनी डॉ. सुनील यांना फोन करून अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. एवढेच नाही तर व्याजाचे हप्त्याचे पैसे आणि त्यावर विलंब दंड असे 42 हजार 500 रूपयांची मागणी केली होती.

अखेर सावकार राहूल गुंजाळ आणि चक्रधर नायक यांचा त्रास असह्य झाल्याने डॉ सुनील यांनी टिळकनगर पोलीस ठाणे येथे धाव घेतली. पोलीसांनी याबाबत अनधिकृत सावकारांच्या विरोधात गुन्हा नोंदवून त्यांना अटक केली आहे. या सावकारांकडून अनेक कोरे सह्या असलेले बॉण्ड पेपर,चेक हस्तगत केले आहेत. त्याच बरोबर डॉ सुनील यांची कार देखील पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. पुढील तपास टिळक नगर पोलीस ठाणे करीत आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

dipakbhogal@surakshapolicetimes.com

  
        

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट