मनी ट्रान्सफर करण्याकरीता ऑटो रिक्षा,मो/सा व मोबाईल चोरी करणा-या आरोपीतास एमएचबी काॅलनी पोलीसांनी ठोकल्या बेड्या…

उपसंपादक-रणजित मस्के
बोरीवली :- सदर गुन्हयाची थोडक्यात हकीकत अशी की,
दिनांक 12/6/2023 रोजी फिर्यादी श्री दुर्गेश सदन यादव वय 33 यांनी त्यांची ऑटो रिक्षा MH 47 X 9162 ही रिवर व्हॅली रोड,शबनम बिल्डिंगच्या बाजूला, शिवाजीनगर, बोरवली पश्चिम, मुंबई या ठिकाणी रात्री 20.00 व्यवस्थित रित्या पार्क करून घरी निघून गेले. त्यानंतर दिनांक 13/6/2023 रोजी त्यांना त्यांची रिक्षा मिळून आल्याने त्यांनी पोलीस ठाणेे येवून तक्रार दिल्यावरून गुन्हा नोंद क्रमांक 267/2023,कलम 379 भा.द.वि अन्वये नोंद करण्यात आला.
सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये सपोनि सुर्यकांत पवार व पथक यांनी सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता सदरची रिक्षा ही वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे मार्ग चेंबूर येथे एका मनी ट्रान्सफर दुकाना समोर उभी असल्याचे दिसून आले. नमुद मनी ट्रान्सफर दुकानात आरोपीत इसमाने रिक्षा दाखवूून 10 हजार रुपये सुरत,गुजरात येथील बँक खात्यावरती ट्रान्सफर केल्याचे समजले.
त्यावरून नमूद आरोपीताचा शोध घेत असताना मोबाईल सीडीआर माध्यमातून आरोपीत इसम हा सुरत ते काशिमिरा असा सतत प्रवास करत असल्याचे दिसून आले.
दिनांक 10/07/2023 रोजी आरोपित इसमाचे लोकेशन डाचकुलपाडा,काशिगांव,मिरा रोड येथे आले असता जंंगल सदृश्य परिसरात पायी फिरुन आरोपी हा पत्ते खेळत असताना मिळुन आला त्यास लागलीच ताब्यात घेवून अटक करण्यात आले. सदरवेळी त्याचे कडे गु.नो.क्रं 80/23 मधील होंडा शाईन गाडी मिळून आली.

अटक आरोपी नाव व पत्ता:-
नवी आलम उस्मान खान वय 30 वर्ष, व्यवसाय- नाही, रा.ठि:- 13,वरेली,कडोदरा, सुरत गुजरात
नमूद अटक आरोपीकडे केलेल्या तपासामध्ये त्याने
कस्तुरबा मार्ग पोलीस ठाणे – 3
गोरेगाव पोलीस ठाणे – 1
चेंबूर पोलीस ठाणे – 1
बोरीवली पोलीस ठाणे – 1
मिरा रोड पोलीस ठाणे – 1
याठिकाणी मनी ट्रान्सफर करण्याकरीता मोबाईल्स व ऑटोरिक्षा गहाण ठेवून दुकानदारांंची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे.

तसेच दहिसर पोलीस ठाणे – 1
कस्तुरबा पोलीस ठाणे – 1
येथील ऑटो रिक्षा चोरी करुन नायगाव,विरार येथे मनी ट्रान्स्फर दुकानात गहाण ठेवून कनोज,उत्तर प्रदेश येथील बॅंक खात्यावर पैसे पाठवल्याची माहिती देत आहे. नमुद रिक्षाबाबत शोध सुरू आहे.
उघडकीस आलेले गुन्हे
एम.एच.बी काॅलनी पो.ठाणे
1) 267/23, कलम 379 भा.द.वि
( रिक्षा हस्तगत)
2) एम एच बी पोलीस ठाणे 80/23,कलम 379 भा.द.वि
( मो/सा हस्तगत डाचकुल पाडा येथून)
3) कस्तुरबा मार्ग पोलीस ठाणे
419/2023, कलम 420 भा.द.वि
तपास पथक
पो. नि ( गुन्हे )सचिन शिंदे
सपोनि सूर्यकांत पवार
पो.ह 961391/अनिल शिंदे
पो.ह 98 0725/श्रीधर खोत
पो.शि 111518 / सवळी
पो.शि 140340/ योगेश मोरे
मपोशि रुपाली दाईंगडे (परि.11)
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com