मनी लाँडरिंग मध्ये आपले नाव असल्याचे सांगून एका वयोवृद्ध महिलेची २० कोटीची फसवणूक..!

0
Spread the love

प्रतिनिधी-अरविंद पांडे

मुंबई :

सर्वात मोठा डिजिटल अरेस्ट स्कॅम; मुंबईतल्या ८६ वर्षीय महिलेची २० कोटींची फसवणूक…!

Digital Arrest Scam: मागच्या वर्षी ८६ वर्षीय महिलेला पोलीस अधिकारी असल्याचे भासवून चोरट्याने फोन केला होता. मनी लाँडरिंग प्रकरणात तुमचे नाव असल्याचे सांगून महिलेची फसवणूक करण्यात आली.Digital Arrest Scam: डिजिटल अरेस्ट स्कॅमद्वारे सायबर चोरट्यांनी देशभरात धुमाकूळ माजवला असून हजारो लोकांची कोट्यवधीची फसवणूक करण्यात आली आहे.

महिला, वृद्ध आणि निवृत्त कर्मचारी अशा चोरट्यांचे प्रमुख लक्ष्य असतात. मुंबईत डिजिटल अरेस्टचे एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणात थोडीथोडकी नाही तर तब्बल २० कोटींची फसवणूक करण्यात आली आहे. दक्षिण मुंबईतील ८६ वर्षीय महिला या घोटाळ्याला बळी पडली आहे. इंडियन एक्सप्रेसने याबाबत बातमी दिली आहे. सायबर चोरट्यांनी पोलीस अधिकारी असल्याचे सांगून पीडित वृद्ध महिलेला फोन केला होता. आधार कार्डचा अवैध कामासाठी वापर झाल्याचे सांगून पीडितेच्या खात्यामधील पैसे विविध बँक खात्यात वळवून घेण्यात आले२६ डिसेंबर २०२४ ते ३ मार्च २०२५ या काळात सदर घोटाळा झाला असून या काळात आरोपींनी एकूण २०.२५ कोटींची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी मुंबई क्राइम ब्रँचच्या सायबर पोलीस शाखेने दोन जणांना अटक केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट