पैसै वसुलपोटी मुलाला काॅसमाॅस हायस्कूल बाहेरून अपहरण करण्याऱ्या आरोपींच्या दहीसर पोलीसांनी आवळल्या मुसक्या…

0
Spread the love

संपादिका – दिप्ती भोगल

बोरीवली :- दहीसर पोलीस ठाण्यात दिनांक २४ सप्टेंबर २०२४ रोजी दिलेल्या फिर्यादीनुसार दिनांक २३ सप्टेंबर २०२४ रोजी दुपारी १२ ; ३० च्या सुमारास पवनकुमार शुक्ला यांचा १५ वर्षीय मूलगा बोरीवली पुर्व येथील काॅसमाॅस हायस्कूल मध्ये शिकायला गेला असता आरोपीनी पिडीत मुलाचा शाळेबाहेर पहारा ठेवला होता.

हायस्कूल बाहेर येताच त्याला अरोपीनी आपल्या गाडीवर शिविगाळ करून बसवून जबरदस्तीने त्याचा घरी भाईंदर पुर्व येथे घुसून त्याच्या आईला, भावाला शिविगाळ करून मारहाण केली व पवनकुमार शुक्ला यांनी जर आमचे पैसे परत केले नाहीतर जिवे मारण्याची धमकी दिली आणि पिडीत मुलाच्या भावाचा मोबाईल, बहीनीची गाडीची चावी व भाड्याच्या घराच्या अ‍ॅग्रीमेंटचे पेपर जबरदस्तीने घेऊन आरोपी पसार झाले म्हणून घाबरून पिडीत यानी जवळील नवघर पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात तक्रार दाखल केली .

सदर गुन्हा हा दहिसर पोलीस ठाणे हद्दीत घडल्यामुळे गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून परीमंडळ १२ च्या पोलीस उपायुक्त श्रीमती स्मिता पाटील, सहायक पोलीस आयुक्त श्री. किशोर गायके व वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अशोक होनमाने यांचे मार्गदर्शनाखाली आरोपी समाधान, मुकेश, योगेंद्र आणि चेतन सर्व राहणार रावळपाडा , दहीसर यांना अटक करून त्यांच्या विरोधात दहीसर पोलीस ठाण्यात कलम ११५(२) ,१३७ (२) , ३१० (२) , ३३३ , ३५१ (२) , ३ (५) अन्वये गुन्हा दाखल केला असून या घटनेचा अधिक तपास दहिसर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक श्री. गहिनीनाथ फड करीत आहेत.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट