उंब्रज (कालगांव) येथील मयुर साळुंखे व त्याच्या ०६ साथीदारांच्या विरुध्द मोक्का…

0
Spread the love

उपसंपादक – रणजित मस्के

सातारा: कायद्यांतर्गत कारवाई. श्री. समीर शेख, पोलीस अधीक्षक, सातारा व श्री बापू बांगर, अपर पोलीस अधीक्षक, सातारा यांनी सातारा जिल्ह्यातील गुन्हेगारी टोळ्यांवर लक्ष केंद्रीत करुन दहशत निर्माण करुन आर्थिक व इतर फायद्याकरीता संघटीतपणे गुन्हे करणा-या गुन्हेगारांविरुद्ध महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमान्वये प्रभावी कारवाई करण्याबाबत जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, सातारा यांना सूचना दिल्या आहेत.

उंब्रज पोलीस ठाणे जि.सातारा गु.र.नं. ७८/२०२३ भा.दं.वि.सं.कलम ३०७, २८५, २८७, १४३, १४७, १४८, १४९, ५०४, ५०६ दाखल गुन्ह्यातील टोळी प्रमुख आरोपी

१) मयुर महादेव साळुंखे, वय-३४ वर्षे, रा. कालगांव ता. कराड, जि.सातारा व त्यांच्या टोळी सदस्य

२) पंकज अमृत यादव, वय-२७ वर्षे, रा. भवानवादी ता. कराड,

३) शाहरुख रफिक मुल्ला, वय-३० वर्षे, रा. मसुर ता. कराड,

४) सुरज सुर्यकांत जाधव, वय २८ वर्षे, रा. वाघेश्वर पो मसुर ता. कराड,

५) अमोल बाजीराव जाधव, वय-३१ वर्षे, रा. यापेश्वर ता. कराड ,

६ )अक्षय अनिल कोरे, वय- २९ वर्षे, रा. ब्रम्हपुरी, मसुर ता. कराड

७) प्रकाश आनंदराव यादव, वय-३३ वर्षे, रा. ब्रम्हपुरी, मसुर ता. कराड यांचे विरुद्ध सातारा जिल्ह्यातील उंब्रज व कराड शहर तसेच पुणे जिल्ह्यातील निगडी व भारती विद्यापीठ पोलीस ठाणेत खून, खंडणीसाठी खुनाचा प्रयत्न, जबर दुखापत घडवुन आणण्याच्या प्रयत्नासह दरोडा, जबरी चोरी, दरोडयाची तयारी, गंभीर दुखापत, सरकारी नोकरावर हल्ला, अपहरण, आर्म अॅक्ट, अशा प्रकारचे गंभीर स्वरुपाचे अनेक गुन्हे दाखल असून टोळी प्रमुख मयुर साळुंखे, रा.कालगांव, ता. कराड, जि.सातारा. याने त्याचे टोळीची दहशत पसरविण्यासाठी उंब्रज परिसरातील इतर गुन्हेगारांना एकत्र करुन दहशत पसरविल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे सहा. पोलीस निरीक्षक अजय गोरड उंब्रज पोलीस ठाणे यांनी नमुद टोळीविरुद्ध दाखल गुन्ह्यांची माहिती संकलित करून आरोपीचेविरुद्ध महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमान्वये कारवाई करीता पोलीस अधीक्षक सातारा यांचे मार्फतीने मा. विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र यांच्याकडे मोक्का अंतर्गत प्रस्ताव सादर केला होता. नमुद प्रस्तावास मा.श्री सुनिल फुलारी, विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र, कोल्हापूर यांनी मंजुरी दिली असून नमुद गुन्ह्यात मोक्का कायद्याची कलमे लावुन या गुन्ह्याचा तपास श्री. रणजित पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी, फराह विभाग कराह यांच्याकडे देण्यात आला आहे.

माहे नोव्हेंबर २०१२ पासून ०६ मोक्का प्रस्तावामध्ये ९९ इसमांविरुध्द मोक्का कायदयाअंतर्गत कारवाई केली आहे. तसेच १६ इसमांविरुध्द हदपारीसारखी व ०१ इसमास MPDA फायदयान्यये स्थानबध्द करणेत आले आहे. तसेच भविष्यातही सातारा जिल्ह्यामधील सराईत गुन्हेगारांचे विरुध्द मोक्का, हदपारी, MPDA अशा प्रकारच्या कठोर कारवाया करणेत येणार आहेत.

मोक्का प्रस्ताव मंजुरी करीता श्री समीर शेख, पोलीस अधीक्षक, सातारा व श्री बापू बांगर, अपर पोलीस अधीक्षक, सातारा यांचे मार्गदर्शनाखाली श्री रणजित पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड विभाग कराह अरुण देवकर, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, सातारा. अजय गोरड, सहा. पोलीस निरीक्षक उंब्रज पोलीस ठाणे. अमित सपकाळ, पोलीस नाईक स्थानिक गुन्हे शाखा सातारा. तसेच उंब्रज पोलीस ठाणेचे पोलीस अंमलदार संजय देवकुळे, श्रीधर माने यांनी मोक्का कारवाईकरीता सहभाग घेतला आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट